अघोषित भारनियमन परीक्षेच्या काळात बंद

By Admin | Published: March 1, 2017 03:03 AM2017-03-01T03:03:43+5:302017-03-01T03:03:43+5:30

भारनियमन बंद करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केल्याने त्या विरोधात आज अनेक ठिकाणी होणारा निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको रद्द करण्यात आला.

Closed in undeclared load time | अघोषित भारनियमन परीक्षेच्या काळात बंद

अघोषित भारनियमन परीक्षेच्या काळात बंद

googlenewsNext


विक्रमगड : ऐन परीक्षेच्या काळात व उन्हाळ शेतीच्या हंगामाच्या काळात सुरू असलेले घोषित आणि अघोषित भारनियमन बंद करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केल्याने त्या विरोधात आज अनेक ठिकाणी होणारा निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको रद्द करण्यात आला. सर्वत्र चालू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक, विद्यार्थी पुरते हैराण झाले असून या भारनियमनाचा विपरित परिणाम व्यवसाय, शेतीवर होतच आहे.़ १२ वीची परिक्षा सुरु झाली असून आज पहिला इंग्रजीचा पेपर झाला. मात्र तालुक्यात सुरू असलेल्या भारनियमनाचा विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन पालघर जिल्हयांतील विक्रमगड, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा आणि डहाणू या ग्रामीण तालुक्यातील वीज कपात बंद करण्यासाठी जिजाउ शैक्षणिक व सामाजिक संस्था, झडपोलीचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या भारनियमा विरोधात मंगळवारी जिल्हाभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता त्यापार्श्वभूमीवर महावितरणाने हया काळामध्ये भारनियम बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हा रास्ता रोको तत्काळ मागे घेण्यात आला असून यामुळे परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळालेला आहे़ ७ मार्चला १० वीची परीक्षा सुरु होत असून विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागलेले आहेत. तसेच उन्हाळ शेतीच्या हंगामाची कामेही सुरू आहेत. त्यांना या भारनियमन रद्दच्या निर्णयामुळे मोठा दिलासा लाभलेला आहे.
विक्रमगड तालुक्यात कोठेही भारनियमन केले जात नाही तरी देखील १० वी १२ च्या परिक्षे दरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास वीज पुरवठा ताबडतोब पुर्ववत सुरळीत होईल . परीक्षे दरम्यान वीजपुरठा खंडीत होणार नाही यासाठीप्रयत्न घेतले जात आहेत त्यामुळे परीक्षेदरम्यान वीज खंडीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
>जव्हारमध्ये बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू; जागा पडते अपुरी
जव्हार - महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा जव्हारच्या के. व्ही. हायस्कूल क्र. १७९ व ६७९ केंद्रात मंगळवारी सुरू झाली एकूण ११७४ विद्यार्थ्यांची नोंदणी असून पहिल्या दिवशी ११६१ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. इंग्रजीचा पहिला पेपर होता. परिक्षा सुरळित सुरू झालीे. विद्यार्थी वर्गाने उत्साहात आपले बैठक क्रमांक शोधण्यासाठी सकाळी ९.३० वा. पासुन परीक्षा केंद्रात गर्दी केली होती. परीक्षेचा पहिला दिवस असल्यामुळे पालकही आपल्या पाल्यांसोबत हजर होते. आजचा पेपर शांततेत पार पडला.जव्हार तालुक्यात १२ वी परिक्षेकरीता एकच केंद्र आहे. दरवर्षी वाढीव विद्यार्थी संख्येनुसार तालुक्यात किमान २ केंद्र असणे गरजेचे आहे, तसेच खेडोपाड्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना रोज ये जा करणे गैरसोयीचे असल्यामुळे, जव्हार तालुक्यात शहरी व ग्रामीण अशी दोन केंदे्र करावीत, अशी मागणी येथील पालक व विद्यार्थी वर्ग करीत आहेत. वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थीं मिळूण एकुण ११७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचे वेळापत्रक, बारकोड पध्तीचा कसा वापर करवयाचा याबाबतच्या तसेच परीक्षेत गैरप्रकार करू नये अशा सूचना प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन दिल्या जात होत्या. तसेच कोणत्याही प्रकारचे कॉपीचे प्रकार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची गेटवरच झडती घेण्यात आली. अशा खबरदारीमुळे मुळे कॉपी बंद झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. केंद्रासाठी ८ पोलिस व प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी ४ पोलिस असा ताफा केंद्रावर तैनात आला आहे. शिक्षण विभागाचे केंद्र परिरक्षक (कस्टोडियन) चे काम बी. एम. कासले यांच्याकडे आहे. तर केंद्र संचालकाचे काम के.व्ही. हायस्कूलचे प्राचार्य के. एम. महाले सर यांच्याकडे आहे.
>विक्रमगड तालुक्यात एच.एस. सी. चे १२३४ विद्यार्थी परिक्षेसाठी
विक्रमगड: तालुक्यात विक्रमगड हायस्कूल व दादडे हायस्कूल या दोन ठिकाणी १२ वी परिक्षेसाठी केंद्र असून विक्रमगड हायस्कूल मध्ये ९०६ विद्यार्थी तर दादडे मध्ये ३७८ विद्यार्थी बसले आहेत. एकूण १२३४ परिक्षार्थी असून त्यांची आसनव्यवस्था सुनियोजित पद्धतीने करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारावर लक्ष देण्यासाठी तालुका दक्षता समिती स्थापन केली आहे, अशी माहिती प्राचार्या गीतांजली टिळक यांनी दिली.
परीक्षेचे नियोजन व्यवस्थित करण्यात आलेले आहे. कॉपी मुक्त अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे.
- बी.एम.कासले, गटशिक्षणाधिकारी,
पं.स. जव्हार
>वाड्यात बारावीचे २८४९ विद्यार्थी
वाडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेघेण्यात येणाऱ्या १२ वी च्या परिक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून तालुक्यातील तीन केंद्रात २ हजार ८४९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. स्वामी विवेकानंद विद्यालय, पी. जे. हायस्कूल व ह.वि.पाटील विद्यालय चिंचघर अशी तीन केंद्रे आहेत. अशी माहिती कस्टोडीयन विलास शिंदे यांनी दिली.
चिंचघर केंद्रात केंद्र संचालक म्हणून पी. एन. भोईर हे काम पाहत असून येथे ४३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेसाठी कार्यरत आहेत. शाळेचे अध्यक्ष नरेश पाटील, संचालक श्रीकांत भोईर, बी. एच. पाटील मुख्याध्यापक दादाभाऊ पोटकुले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तीनही केंदावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.

Web Title: Closed in undeclared load time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.