भाषांच्या तोंडी परीक्षा होणार बंद

By admin | Published: July 15, 2017 05:31 AM2017-07-15T05:31:04+5:302017-07-15T05:31:04+5:30

गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात.

Closing of oral test of languages ​​will take place | भाषांच्या तोंडी परीक्षा होणार बंद

भाषांच्या तोंडी परीक्षा होणार बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात मिळणारे गुण पाहून अनेक तज्ज्ञ व्यक्तीही थक्क होतात. अनेक विद्यार्थ्यांना भाषा विषयातली ९० ते ९५ गुण मिळतात. शाळेमार्फत दिल्या जाणाऱ्या २० गुणांमुळे गुणांत वाढ होते, परंतु आता इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. भाषा विषयांसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा आणि ८० गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत आता बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केला.
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांचा १०० गुणांचा पेपर लिहावा लागणार आहे. शाळेकडून घेतली जाणारी २० गुणांची तोंडी परीक्षा बंद होईल. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठीही हाच नियम असेल.
इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, द्वितीय भाषांची तोंडी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना असल्याने शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात होते. त्यामुळे दहावीचा अंतिम निकाल फुगलेला दिसून येत होता. याचा परिणाम वाढत्या टक्केवारी स्वरुपात दिसून येत होता. याविषयी अनेक शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिक्षणमंत्र्यांनाही याची माहिती दिली होती.
त्यानंतर, गेल्याच महिन्यात राज्य शिक्षण मंडळाने नववी आणि दहावीसाठी अभ्यासक्रम बदलांचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या वेळी परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले.
परिपत्रकानुसार, भाषा विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर संयुक्त भाषा विषयांसाठी ५० गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. या परिपत्रकात भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण कळतील, असे
मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
अशी होणार परीक्षा
संपूर्ण भाषा विषयांसाठी १०० गुणांची, तर संयुक्त भाषा विषयांसाठी प्रत्येकी ५० गुणांची लेखी परीक्षा.
गणित हा १०० गुणांचा विषय. यातील ८० गुण लेखी आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी. ८० गुणांमध्ये ४० गुण बीजगणित आणि ४० गुण भूमितीसाठी.
विज्ञान-तंत्रज्ञान विषयाची २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार.
८० गुणांमध्ये भाग १ व भाग २ प्रत्येकी ४० गुणांचा.
सामाजिकशास्त्रे या विषयांतर्गत इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल मिळून १०० गुण. इतिहास ४०, राज्यशास्त्र २० व भूगोल ४० अशी गुणांची विभागणी.
यापुढे श्रेणी विषयांची लेखी परीक्षा होणार नाही. आरोग्य व शारीरिक शिक्षण, स्व-विकास व कलारसास्वाद, संरक्षणशास्त्र, एमसीसी हे श्रेणी विषय आहेत.

Web Title: Closing of oral test of languages ​​will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.