संपाची हाक कायम, 5 जूनला मुंबईवगळता महाराष्ट्र बंद

By admin | Published: June 2, 2017 05:31 PM2017-06-02T17:31:57+5:302017-06-02T19:04:56+5:30

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण

The closing of the strike, on the 5th of June, will be closed from Mumbai to Mumbai | संपाची हाक कायम, 5 जूनला मुंबईवगळता महाराष्ट्र बंद

संपाची हाक कायम, 5 जूनला मुंबईवगळता महाराष्ट्र बंद

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 02 -  जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी शेतक-यांनी घेतला आहे. 
पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच, 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, शेतकरी संपाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाला मुंबईत बोलावले असून, रात्री आठ वाजता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणार आहे. या बैठकीसाठी पुणतांबा येथून शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे.
किसान क्रांतीची पुणतांबा येथे दुपारी 4 वाजता बैठक झाली. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मध्यस्थी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 5 जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट्र बंदची हाक समितीने दिली आहे. समितीच्या मागण्या होईपर्यंत संप सुरुच ठेवण्यात येणार आहे, असा किसान क्रांती कोअर कमिटीने निर्णय पुणतांबा येथील बैठकीत घेतला होता. त्यानंतर मुंख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कोअर कमिटीला मुंबई मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य धनंजय धोरगडे, धनंजय जाधव, जयाजीराव सुर्यवंशी, संदीप गिड्डे आदींचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे. 

Web Title: The closing of the strike, on the 5th of June, will be closed from Mumbai to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.