गृहरक्षक दलाची साप्ताहिक परेड बंद

By admin | Published: January 22, 2015 10:53 PM2015-01-22T22:53:59+5:302015-01-23T00:48:02+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात अकराशे होमगार्ड आहेत. यांचा शासनाकडे ५० ते ५५ लाख रुपये कर्तव्य भत्ता थकीत आहे.

Closing the Weekly Parade of the Homeworker Dalachi | गृहरक्षक दलाची साप्ताहिक परेड बंद

गृहरक्षक दलाची साप्ताहिक परेड बंद

Next

निधीची कमतरता : जिल्हा मुख्यालयांना आदेश; कोल्हापूर जिल्हा समादेशक पदही रिक्त; एक हजार कर्मचारी
प्रकाश पाटील ल्ल कोपार्डेपोलिसांना दंगलीच्या अथवा आपत्कालीन परिस्थितीत मदत व्हावी या उद्देशाने तत्कालीन पंतप्रधानमोरारजी देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी गृहरक्षक दलाची (होमगार्ड) स्थापना केली होती. हे दल संपूर्णपणे मानसेवी असून, यामध्ये समाजातील विविध घटकांतील लोक आपला सहभाग ठेवून शासनाला म्हणण्यापेक्षा पोलीस दलाला मदत करीत होते. यात सण, निवडणुका, पूर, दंगली, यांसह आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करून आपले योगदान देत असत. गृहरक्षक दलाला शिस्त आणि कर्तव्याचे शिक्षण देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक कवायत व परेड दिली जात असे. मात्र, अलीकडेच राज्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलाच्या जिल्हा मुख्यालयांना साप्ताहिक परेड बंद करण्याचा आदेश १२ डिसेंबर २०१४ ला आल्यापासून ती बंद करण्यात आली असल्याने गृहरक्षक दलाला मरगळ येणार आहे. मुंबई प्रांत व परिसरात उसळलेल्या जातीय दंगलीनंतर पोलीस दलाला सामाजिक सुरक्षितता व संरक्षण देणे अवघड होऊन बसले. यामुळे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मानसेवी संघटना म्हणून गृहरक्षक दलाची स्थापना केली. अलीकडे शासनाने पोलीस दलात होमगार्ड असणाऱ्या उमेदवाराला पोलीस व संरक्षण दलातील भरतीवेळी आरक्षण दिल्याने व कर्तव्य भत्त्यातही ४०० रुपयांपर्यंत वाढ केल्याने युवकांचा गृहरक्षक दलात भरती होण्याकडे कल वाढला होता. बऱ्याच बेरोजगार युवकांना गृहरक्षक दल हा रोजगारासाठी काडीचा आधार होता. मात्र, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणूक, नवरात्र व ईद सणाचा भत्ताच या होमगार्डस्ना मिळाला नसल्याने आधीच आर्थिक तंगीत असणाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अकराशे होमगार्ड आहेत. यांचा शासनाकडे ५० ते ५५ लाख रुपये कर्तव्य भत्ता थकीत आहे.

जिल्हा समादेशक पदच रिक्त
कोल्हापूर जिल्ह्यासाठी असणारे गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशकपद गेली दीड वर्षे रिक्त आहे. विलासराव पाटील (कौलवकर) हे नोव्हेंबर २०१३ मध्ये पदमुक्त झाले. त्यानंतर हे पद एक वर्षे रिक्त होते. सध्या या पदाचा प्रभारी पदभार नियंत्रण कक्ष कसबा बावड्याकडे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे अरुण पवार यांच्याकडे दिला गेला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक दर्जा असणारे जिल्हा समादेशकपद पोलीस निरीक्षकांकडे दिल्याने या गृहरक्षक दलाबद्दलची शासनाची उदासीनता लक्षात येते.

कर्तव्य भत्त्याची बिले लवकरच ट्रेझरीकडे पाठवून गृहरक्षकदलातील कर्मचाऱ्यांना भत्ता देणार आहे. १२ डिसेंबर २०१४ ला महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशकांकडून साप्ताहिक परेड बंदचा आदेश दिला आहे.
- एम. जे. शिंदे, वरिष्ठ लिपिक

Web Title: Closing the Weekly Parade of the Homeworker Dalachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.