कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कडकडीत बंद

By admin | Published: July 11, 2016 06:35 PM2016-07-11T18:35:45+5:302016-07-11T18:35:45+5:30

व्यापारी, अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या.

The closure of Agriculture Produce Market Committees | कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कडकडीत बंद

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कडकडीत बंद

Next

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 11-  फळे व भाजीपाला नियंत्रणमुक्त करतानाच शेतकऱ्यांंऐवजी खरेदीदाराकडून व्यापाऱ्यांचे कमिशन (अडत) घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारी, अडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी कडकडीत बंद होत्या.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये फळे आणि भाजीपाल्याची थेट विक्री करणाऱ्यांना शासनाने सर्व नियमातून सूट दिली. बाजार समितीमध्ये मात्र शेतकऱ्यांंऐवजी ग्राहकांकडून अडत घेण्याचे बंधन घातले. या दुहेरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत सामूहिक आंदोलन सुरू केले आहे.
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मानोरा आणि मालेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून शिरपूरजैन, अनसिंग, राजगांव याठिकाणी उपबाजार समिती अस्तित्वात आहे. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सर्वच बाजार समित्यांचे व्यवहार सोमवारी ठप्प झाले. सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांंकडून एकूण रकमेच्या ८ टक्के अडत वसूल केली जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या हितास्तव शासनाने शेतकऱ्यांकडून अडत वसूल न करता ग्राहकांकडून वसुलीचा निर्णय घेतला. त्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

Web Title: The closure of Agriculture Produce Market Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.