अनुदानाअभावी बालकामगार केंद्रे बंद
By admin | Published: April 10, 2015 04:10 AM2015-04-10T04:10:03+5:302015-04-10T04:10:03+5:30
गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अनुदान थकल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बालकामगार केंद्रे अनुदानाअभावी बंद पडली आहेत.
तळोदा (जि. नंदुरबार) : गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अनुदान थकल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बालकामगार केंद्रे अनुदानाअभावी बंद पडली आहेत. साहजिकच कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनुदानाबाबत संस्थांकडून पाठपुरावा होऊनही याप्रकरणी उदासीन भूमिका घेण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास विभागामार्फत २०१० पासून बालकामगार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ९ते १४ वयोगटातील मुला-मुलींचा त्यात समावेश आहे. परंतु जानेवारी २०१३ पासून अनुदान नसल्याने एप्रिल २०१४ पासून संस्थाचालकांनी बालकामगार केंद्रे बंद केली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)