‘त्या’ अधिकाऱ्यांना १९ एप्रिलपर्यंत कोठडी
By admin | Published: April 17, 2017 03:13 AM2017-04-17T03:13:20+5:302017-04-17T03:13:20+5:30
पालघर जिल्हा आश्रमशाळेतील मुख्य अधीक्षिका (रेक्टर) कडून १२ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आदिवासी विभागाचे
ठाणे : पालघर जिल्हा आश्रमशाळेतील मुख्य अधीक्षिका (रेक्टर) कडून १२ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे आणि उपायुक्त किरण माळी या दोघांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणे एसीबी विभागाने दिली.
शनिवारी सायंकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या वेळी, माळीला पैसे घेताना पालघर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. हे पैसे त्याने गवादे यांच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे चौकशीत म्हटल्यानंतर गवादे यांनाही अटक झाली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी दोघांना ठाणे विशेष न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्या दोघांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती तपास अधिकारी तथा पालघर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजय अफले यांनी दिली. (प्रतिनिधी)