लातूरजवळ ढगफुटी, कोकणात मुसळधार

By admin | Published: June 23, 2016 04:57 AM2016-06-23T04:57:11+5:302016-06-23T04:57:11+5:30

नेहमीची कोकणची वाट सोडून विदर्भमार्गे चोरपावलाने राज्यात आलेल्या मान्सूनने बुधवारी कोकणाला झोडपून काढले. कोकणात सर्वदूर धुवाँधार पाऊस झाला

A cloudburst near Latur, and a strong in Konkan | लातूरजवळ ढगफुटी, कोकणात मुसळधार

लातूरजवळ ढगफुटी, कोकणात मुसळधार

Next

पुणे़/लातूर : नेहमीची कोकणची वाट सोडून विदर्भमार्गे चोरपावलाने राज्यात आलेल्या मान्सूनने बुधवारी कोकणाला झोडपून काढले. कोकणात सर्वदूर धुवाँधार पाऊस झाला. लातूरजवळच्या औराद शहाजानीत ढगफुटी झाल्याने तेरणा नदीवरील तीन बंधारे ओव्हरफ्लो झाले. तेथे ९० मिनिटांत तब्बल ९४ मि.मी. पाऊस झाला. गोव्यातही अतिवृष्टी झाली.
लातूरजवळच्या औराद शहाजानी परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास ढगफुटी झाली. जवळपास ९० मिनिटांत तब्बल ९४ मि.मी. पाऊस झाला. तब्बल १५ वर्षांनंतर जून महिन्यात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला.
कोकणात सर्वाधिक २५२ मिलिमीटर पाऊस देवगड तालुक्यात कोसळला, तर त्यापाठोपाठ मालवण तालुक्यात १४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पनवेल ते हर्णेबंदरपर्यंत पावसाचा चांगला जोर होता. पणजीत १५५ मिमी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, मलकापूर, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथेही चांगला पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: A cloudburst near Latur, and a strong in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.