Surya Grahan 2019 : कंकणाकृती सूर्यग्रहणावर ढगाळ वातावरणाचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:35 AM2019-12-26T06:35:30+5:302019-12-26T06:36:07+5:30
Surya Grahan 2019 : खराब हवामानाचा शेतीला फटका: काही ठिकाणी पावसाची शक्यता
मुंबई : लक्षद्वीपपासून उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही विभिन्न वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार झालेले आहे. या सगळ्याचा परिणाम होऊन मुंबईसह नागपूर, अकोला, नाशिक, पुणे येथे तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच २६ डिसेंबर रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने गुरुवारी होणाºया कंकणाकृती सूर्यग्रहणावर सावट आले आहे.
बुधवारी पहाटे आणि दिवसभरात मुंबई-ठाण्यासह नाशिक व सांगली भागात तुरळक शिडकावाही झाला. दरम्यान पाऊस व ढगाळ हवामानामुळे श्ोतीचे नुकसान झाले आहे. मंगळवारप्रमाणेच बुधवारीदेखील मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वातावरण ढगाळ होते. मुंबईकर थंडीची वाट पाहत असतानाच त्यांना पावसाची भेट मिळाली. बुधवारी मुंबईचे किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आणि कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
पावसाची शक्यता
२६ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २७ ते २९ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण-गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वाºयाचे एक संगम क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बºयाच भागांत तसेच मध्य आणि पूर्व मध्य प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात एक-दोन ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
हवेचा दर्जा वाईट
कुलाबा व भांडुप येथील हवेचा दर्जा मध्यम असून बोरीवली व चेंबूर येथील हवेचा दर्जा पूर्णत: घसरल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील बीकेसी, मालाड व वरळी येथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात २६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरपासून अंशत: निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग