महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्लस्टर - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:56 AM2018-06-13T05:56:30+5:302018-06-13T05:56:30+5:30
कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन, कीड निर्मूलन तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयीच्या समस्या येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआय) सोडवल्या जातील.
मुंबई - कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन, कीड निर्मूलन तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयीच्या समस्या येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआय) सोडवल्या जातील. यासाठी महाराष्टÑात ‘एआय’वर आधारित उद्योगांच्या क्लस्टरची निर्मिती केली जाईल. त्यातून २०२५ पर्यंत २३ कोटी रोजगारनिर्मिती होऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा दौऱ्यादरम्यान यासंबंधीच्या सामंजस्य करारावेळी तेथील उद्योजकांना दिली.
कॅनडा व अमेरिकेच्या दौºयावर असलेले मुख्यमंत्री तेथील विविध क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेत आहेत. यादरम्यान त्यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने क्यूबेक प्रांतातील ‘इन्स्टिट्युट आॅफ डाटा व्हॅलोरायझेशन’ (आयव्हीएडीओ), क्यूबेक फंड्स नेचर टेक्नॉलॉजिस व नेक्स्ट एआय या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
या दौºयात राज्य सरकारने ‘एआय’ संबंधी करार केला. करारानुसार राज्यातील ५० स्टार्ट अप्सना ‘नेक्स्ट एआय’ ही कंपनी कृत्रिम बुद्धीमत्तेसाठी सहकार्य करणार आहे. क्यूबेकच्या उप प्रमुख डॉमनिक अॅन्ग्लेड यावेळी उपस्थित होत्या.
क्यूबेक सिटी येथे कॅनडा-इंडिया बिझनेस काऊन्सिलच्या (सीआयबीसी) बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.
भारतात येणारी सर्वाधिक गुंतवणूक महाराष्टÑात येते. महाराष्टÑ भारतासाठी ‘पॉवर हाऊस’ आहे. त्यामुळे कॅनडातील कंपन्यांनीही महाराष्टÑात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कॅनडातील भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूप, कॅनडाचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉर्डन रिव्हज् यावेळी उपस्थित होते.
या दौºयादरम्यान क्यूबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारमंत्री क्रिस्टिन
सेंट पीअर यांचीही मुख्यमंत्र्यांनी
भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव
एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.