मतदान यंत्रे बंद पडल्याने अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण

By Admin | Published: February 21, 2017 08:41 AM2017-02-21T08:41:08+5:302017-02-21T08:44:19+5:30

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरात मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे.

Cluttering atmosphere in many places due to the closure of voting machines | मतदान यंत्रे बंद पडल्याने अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण

मतदान यंत्रे बंद पडल्याने अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ -  जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरात मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. नाशिकमध्ये एका मतदान केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे मतदान बंद पडले असून अधिका-यांना पाचारण करण्यात आले आहे. तर भायखळा पूर्वेकडील महापालिका शाळेतही मतदानादरम्यान अडचणी येत आहेत. मतदारांच्या स्लीपवर वर्गांचे खोली क्रमांक लिहिण्यात आले असून मतदान केंद्र क्रमांक छोट्या अक्षरात लिहीण्यात आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला आहे. काहीजण खोली क्रमांकाप्रमाणे बुथ शोधत असून या सर्वगोंधळामुळे काही केंद्रांवर तोबा गर्दी तर काही ठिकाणी शुकशुकाट पसरला आहे. तर बूथ क्रमांक ११ येथील मशीन बंद पडल्याने तेथील मतदानही थांबले आहे. हा गोंधळ पाहून सर्व पक्षीय उमेदवारांनी केंद्रावर धाव घेतली आहे.

Web Title: Cluttering atmosphere in many places due to the closure of voting machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.