ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

By admin | Published: February 27, 2016 03:11 PM2016-02-27T15:11:54+5:302016-02-27T15:13:41+5:30

ली अनेक वर्षे सुरू असलेली ठाणेकरांची क्लस्टर डेव्हपलपमेंटची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असून

CM approves cluster development in Thane | ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 27 - गेली अनेक वर्षे सुरू असलेली  ठाणेकरांची क्लस्टर डेव्हपलपमेंटची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असून त्यामुळे ठाणे शहरातील लक्षावधींना सुरक्षित घर मिळणार असल्याची भावना आमदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
ठाण्यातील धोकादायक इमारती दर पावसाळ्यात कोसळून येथील रहिवाशांचे नाहक बळी जात असल्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी १० वर्षांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी २००४ साली आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यापासून विधानसभेत तसेच विधानसभेबाहेर या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा लावून धरला होता. 
आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची घोषणा केली होती, मात्र त्यात काही त्रुटी राहिल्यामुळे गेली दोन वर्षे या योजनेची अमलबजावणी होत नव्हती.
गेल्या दीड वर्षांत या योजनेसमोरील सर्व कायदेशीर अडचणी दूर करण्यात आले आहेत. 
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर संजय मोरे यांनी जलदगतीने सोशल इम्पॅक्ट अॅसेसमेंट पूर्ण करून या प्रयत्नांना बळ दिले होते. अखेरीस यास यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे.
श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून हा समस्त ठाणेकरांच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे.
आता संपूर्ण ‘एमएमआर’मध्ये ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
 

Web Title: CM approves cluster development in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.