VIDEO- मुख्यमंत्री म्हणाले, 'अमृता, तुला माझ्यावर भरवसा नाय का'?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 01:36 PM2018-04-11T13:36:16+5:302018-04-11T13:36:16+5:30

पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, तेव्हा त्यांनीही हसत हसत ही ओळ पूर्ण केली.

CM Devendra fadanavis played Rapid fire round on lokmat maharashtrian of the year red carpet | VIDEO- मुख्यमंत्री म्हणाले, 'अमृता, तुला माझ्यावर भरवसा नाय का'?

VIDEO- मुख्यमंत्री म्हणाले, 'अमृता, तुला माझ्यावर भरवसा नाय का'?

Next

मुंबई- 'सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का?' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांनीच हे गाणं आपापल्या पद्धतीने म्हटलंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गाण्यानं 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरही धम्माल उडवून दिली.

'लोकमत'च्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याला हजर राहिलेल्या जवळपास प्रत्येक कलाकाराने, राजकीय नेत्याने  'सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का?'  या ओळीमधील सोनू हा शब्द काढून त्याजागी त्यांच्या मनातील नाव टाकून ओळ पूर्ण केली.

पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, तेव्हा त्यांनीही हसत हसत ही ओळ पूर्ण केली. 'अमृता तुला माझ्यावर भरवसा नाय का'? असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. इतकंच नाही, तर रेड कार्पेटवर रंगलेल्या रॅपिड फायर राऊंडमधील विविध प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली. 'नागपूर हे महाराष्ट्रीतील आवडतं ठिकाण आहे, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये झुणका भाकरी सर्वात जास्त आवडते, उषःकाल होता होता, काळ रात्र झाली, हे मराठीतील सर्वात आवडतं गाणं आहे, तसंच जर राजकारणात आलो नसतो तर वकील नक्की झालो असतो, अशी मजेशीर उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखतही झाली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. राऊत यांच्या रोखठोक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी तितकीच थेट उत्तरं दिली.

Web Title: CM Devendra fadanavis played Rapid fire round on lokmat maharashtrian of the year red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.