मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:09 PM2019-10-23T15:09:00+5:302019-10-23T15:10:04+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मोदींची केदारनाथला ध्यानधारणा

cm devendra fadnavis visits kedarnath temple before maharashtra election 2019 result | मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

Next

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. महाराष्ट्राचे कारभारी बदलणार की महायुती सत्ता राखणार या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळेल. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रचाराची धामधूम आणि मतदान संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केदारनाथला भेट दिली होती. 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी (१९ ऑक्टोबर) संपला. त्यानंतर सोमवारी (२१ ऑक्टोबर) राज्यात मतदान पार पाडलं. उद्या मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तराखंडमधल्या केदारनाथाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'आज सकाळी केदारनाथाचं दर्शन आणि आशीर्वाद घेतले. हर हर महादेव!', असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी पत्नी अमृतादेखील त्यांच्यासोबत होत्या. 



लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींदेखील केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाआधी मोदी केदारनाथला गेले होते. १९ मे रोजी निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार होतं. त्याआधी म्हणजेच १८ मे रोजी मोदी केदारनाथला गेले. त्यांनी जवळपास १५ तास एका गुहेत ध्यानधारणा केली. यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपाला ३०३ जागा मिळाल्या. 

Web Title: cm devendra fadnavis visits kedarnath temple before maharashtra election 2019 result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.