मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यात 'या' गोष्टीची लागलीय स्पर्धा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:22 PM2022-08-22T20:22:20+5:302022-08-22T20:23:02+5:30

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी राष्ट्रवादीचे नेतेमंडळी सोडत नाहीत

CM Eknath Shinde and Devendra Fadnavis are competing for this special reason says NCP Shashikant Shinde | मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यात 'या' गोष्टीची लागलीय स्पर्धा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांच्यात 'या' गोष्टीची लागलीय स्पर्धा; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

Next

NCP Trolls Shinde Fadnavis: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या सरकारला टोला लगावला. "मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सवाला ऑलिम्पिकमध्ये नेऊ, गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षण देऊ. उल्हासनगरमध्ये एका मद्यपीने दोरखंडावरुन हंडी फोडली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने कोर्टात सांगितले की शासकीय नोकरी मिळावी म्हणून त्याने असे कृत्य केले. आता शासकीय नोकरी कोणत्या थराला द्यायची, हे अजून ठरायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय जाहीर करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी देखील सरकारने चढाओढ करावी", असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरपरिस्थितीला आळा घालण्यासाठी शिंदे यांनी सल्ला दिला. "राज्यातील अनेक धरणांमध्ये गाळ साचलेला आहे. कोयनासारखी अनेक धरणे आहेत जी ऑगस्टमध्येच भरायला लागली आहेत. धरणांचा पाणीसाठा कमी होतोय, धरणात गाळ असल्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्येच दुष्काळाची समस्या जाणवू शकेल. धरणांमधील गाळ कमी केला तर अतिवृष्टीनंतरची पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. हा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा", अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. 

"ढगफुटी आता सर्रास व्हायला लागली आहे. त्यामुळे मदत करण्यासाठी एका दिवसाचा अतिवृष्टीचा निकष लागू होत नाही. त्यामुळे ढगफुटीसंदर्भात निकष बदलले गेले पाहिजेत. केंद्राने इतर राज्यांना मदत केली आहे. पण मागील महाविकास आघाडी सरकार त्यांच्या विचारांचे नसल्यामुळे दुजाभाव दाखवला गेला असेल. पण आता ईडीच्या माध्यमातून का असेना नवीन सरकार आणले आहे. त्यामुळे केंद्रातून आता महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त मदत आणणे आवश्यक आहे. यावेळी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जाऊ नये", अशी अपेक्षाही आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: CM Eknath Shinde and Devendra Fadnavis are competing for this special reason says NCP Shashikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.