छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी CM एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:51 PM2024-08-29T17:51:07+5:302024-08-29T17:53:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

CM Eknath Shinde Apologizes In Rajkot Chhatrapati Shivaji Maharashtra Statue Case; Appealed to the opposition for cooperate | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी CM एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी CM एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही आवाहन आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे यावर विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्याठिकाणी कसा उभा राहील यासाठी सहकार्य करावे असं शिंदेंनी म्हटलं आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक माफीची मागणी ते करतायेत, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा तिथे उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला पण ही घटना घडलेली आहे. या घटनेचं राजकारण करणे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे यावर राजकारण करू नये असं त्यांनी सांगितले. 

तसेच कालच्या बैठकीत तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा अशी नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना तिथे पाहणी करणे आणि हा पुतळा पुन्हा उभं करणे यासाठी ते कटिबद्ध आहे. अजित पवारांनीही जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजपा आणि अजित पवार  आम्ही सगळे महायुतीत काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

लोकसभेतील धक्क्यानंतर, ३ पक्ष आणि महायुती सरकारने उचललेल्या पावलांमुळे वातावरण फिरतंय किंवा फिरेल, असं वाटतं का?

हो, महायुतीला फायदा होऊ शकतो (345 votes)
नाही, वातावरण फिरताना दिसत नाही (505 votes)

Total Votes: 850

VOTEBack to voteView Results

दरम्यान, मालवणची घटना अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी आहे. नेव्हीने जो कार्यक्रम तिथे घेतला तो चांगल्या भावनेने घेतला होता. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. त्याबाबत काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेव्हीचे अधिकारी आणि आपले अधिकारी होते. त्यात २ संयुक्त समिती स्थापन केली. त्यात एक समिती दुर्घटना कशी झाली त्याची चौकशी आणि कारवाई करेल. दुसरी समिती त्यात तज्ज्ञ, शिल्पकार, आयआयटी, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिले ही जनसामान्यांची भावना आहे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. अनेक शिल्पकारांना आम्ही बैठकीला बोलावले होते. मालवणात पुन्हा मजबुतीने पुतळा उभा राहावा. लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या आम्ही समजू शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: CM Eknath Shinde Apologizes In Rajkot Chhatrapati Shivaji Maharashtra Statue Case; Appealed to the opposition for cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.