“शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 04:01 PM2023-09-03T16:01:04+5:302023-09-03T16:04:08+5:30

CM Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाचे आरक्षण गेले. जालन्यात दगडफेक कोणी केली हे पाहावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

cm eknath shinde criticised opposition maha vikas aghadi over maratha reservation | “शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

“शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

googlenewsNext

CM Eknath Shinde: जालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. राज्यभर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारचा निषेध करत, घोषणाबाजी केली जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचं आरक्षण गेले. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले. मूक मोर्चे निघाले होते. लोक हे विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावे लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता

मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. गरीब शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. मीही सर्वसामान्य एक मराठा आहे. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असे नसते. सरकार पडेल म्हणून नुसती चर्चा होते. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. मुख्यमंत्री बदलणार म्हणून आता ओरड सुरु आहे. एका शेतकऱ्याच्या पुत्रामागे तुम्ही का लागला आहात? मला का तुम्ही पाण्यात पाहता? अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली. 

सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून पाडण्याचा प्रयत्न 

सर्वसामान्यांमध्ये मिसळतो, ईरशाळवाडीमध्ये मी पीडितांना भेटायला गेलो हा माझा गुन्हा आहे का? महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी मदतीला गेलो, शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतो हा माझा गुन्हा आहे का? मी धनदांडगा नाही म्हणून, तोंडात सोन्याचा चमचा नाही म्हणून की माझे बापजादे मंत्री-आमदार नाहीत, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून मला पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण, जोपर्यंत ही जनता माझ्यासोबत आहेत,तोपर्यंत माझे काहीही होणार नाही, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी घणाघात केला. 

दरम्यान, काही लोक आंदोलनस्थळी येऊन गेले. पण, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री येऊन गेले. पण, २०१७ मध्ये आमच्याच सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले होते. पण, पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले, असे सांगताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येत बरी नसल्याने कार्यक्रमाला आले नाहीत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियोजित दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर म्हणून ते नाराज आहेत अशी पत्रकारांनी बातमी लावू नये, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला.
 

Web Title: cm eknath shinde criticised opposition maha vikas aghadi over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.