Eknath Shinde Group Ayodhya Visit: “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:58 AM2023-04-06T11:58:35+5:302023-04-06T11:59:15+5:30

Eknath Shinde Group Ayodhya Visit: अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

cm eknath shinde group ayodhya visit first teaser launch | Eknath Shinde Group Ayodhya Visit: “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

Eknath Shinde Group Ayodhya Visit: “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

googlenewsNext

Eknath Shinde Group Ayodhya Visit: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार अयोध्येला जाणार आहेत. शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर जारी करण्यात आला आहे.  अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ..., असे सांगत या टीझरमध्ये हिंदुत्व,भगवा अन् रामराज्याची झलक दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक टीझर लाँच करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा असे मुद्दे ठसवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर हा टीझर वेगाने व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन देण्यात आली असून, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रात रामराज्य, महाराष्ट्र सुशासित राज्य

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य, महाराष्ट्र एक सुशासित राज्य असल्याचे दर्शवण्यात आले आहे. सामान्य जनता हा एक परिवार आहे, जनतेची सेवा, मानव सेवा सर्वोपरि आहे, असे या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, अशी ग्वाही देत, रग रग में राम, कण कण में… अशा प्रकारे ओळी वापरून हिंदी भाषेतून हा टीझर बनवण्यात आलाय. तर सर्वांत अखेरीस अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. भगवा, हिंदुत्व आणि रामराज्य ही प्रतिमा जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न या टीझरमधून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, अशी योजना शिंदे गटाने आखल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे समर्थित शिवसेनेचे पक्षसंघटन आणि प्रतिमा दृढ करण्याची सुरुवात अयोध्या दौऱ्यापासून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: cm eknath shinde group ayodhya visit first teaser launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.