"चंपासिंह थापाला बोलावून CM शिंदेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 06:55 PM2022-10-06T18:55:50+5:302022-10-06T18:58:08+5:30

मुख्यमंत्र्यांचा BKCवरील मेळावा अयशस्वी ठरल्याचाही राष्ट्रवादीचा दावा

CM Eknath Shinde insults Families of deceased farmer by calling Champa Singh Thapa at Dasara Melava BKC | "चंपासिंह थापाला बोलावून CM शिंदेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला"

"चंपासिंह थापाला बोलावून CM शिंदेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला"

Next

Champa Singh Thapa, Dasara Melava: मुंबईत दसऱ्याच्या मुहुर्तावर पहिल्यांदाच एका पक्षाचे दोन मेळावे पाहायला मिळाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात तर उद्धव ठाकरेंकडून पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यात आला. दोन्ही मेळाव्यांना तुफान गर्दी दिसून आली. दोन्ही गटांकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले गेले. गर्दीची स्पर्धा दोन्ही गटांकडून सुरू होती. असे असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा अयशस्वी ठरल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच, चंपासिंह थापाला बोलावून CM एकनाथ शिंदे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

"एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात तेव्हा राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरण मांडतील परंतु योजना मिळणं दूर मुख्यमंत्र्यांना भाषणात धोरणही जाहीर करता आलं नाही. त्यामुळेच त्यांचा हा मेळावा फेल झाला आहे. या मेळाव्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला बोलावलं असतं तर महाराष्ट्राला आधार मिळाला असता. पण चंपासिंह थापाला बोलावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा एकाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपमान केला आहे" असा आरोप तपासे यांनी केला.

"एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसवर टिका केली. त्यांनी जरुर टिका करावी परंतु अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी बसलेले जनतेने पाहिले आहे आणि त्या काळात मुंबई व महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयामध्ये शिंदे सहभागी होते. त्यामुळे आज टिकेतून दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट  बोलणं योग्य नाही. ज्या पध्दतीचे भाषण एकनाथ शिंदे करत होते. समजा काल पाऊस आला असता तर हातासमोरील चिठ्ठी भिजली असती तर नेमकं पुढे काय बोलावं हे सुचलं नसतं. त्यामुळे परमेश्वराला पाऊस न पाडल्याबद्दल लाख आभार मानले पाहिजेत," असा टोला त्यांनी लगावला.

"राजकारणात असताना आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून होत्या मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कुठलीही नवीन योजना मोठा मेळावा घेऊनही मांडू शकले नाहीत वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. जी लोकं बीकेसीच्या मैदानावर आली कशी आणली हे संपूर्ण माध्यमातून दाखवण्यात आले. बीकेसीच्या शेजारी असलेले मुंबई विद्यापीठाचे मैदान आहे त्यावर कसल्या बाटल्यांचा खच जमा झाला आहे याचेही चित्रिकरण माध्यमातून झाले आहे. वास्तविक काल आणलेली गर्दी ही दर्दी होती का की पैसे देऊन जमवलेली गर्दी होती याचा निर्णय राज्यातील जनतेने करावा असे सांगतानाच कालच्या शिंदेच्या मेळाव्यातून महाराष्ट्राला काही मिळाले नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," अशी टीकादेखील महेश तपासे यांनी केली.

Web Title: CM Eknath Shinde insults Families of deceased farmer by calling Champa Singh Thapa at Dasara Melava BKC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.