CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:06 PM2023-02-05T17:06:24+5:302023-02-05T17:08:10+5:30

CM Eknath Shinde OSD: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. या जीवघेण्या अपघात नेमके एक आजी-आजोबा कारमध्ये अडकले.

cm eknath shinde osd dr rahul gethe save life of old age people who face fatal accident on mumbai pune expressway | CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

googlenewsNext

CM Eknath Shinde OSD: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. या जीवघेण्या अपघात नेमके एक आजी-आजोबा कारमध्ये अडकले. ते जिवाच्या आकांताने ओरडत राहिले. पण धडकलेल्या कारमध्ये लोखंडी कठड्याचा भलामोठा पत्राच घुसल्याने आजी-आजोबांना बाहेर काढणे अवघड होते. मदतीसाठी कोणी थांबत नव्हते. तेवढ्यात मुंबईहून पुण्याकडे निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी थांबले. फोनाफोनी करून पोलीस आणि अन्य यंत्रणेला काही मिनिटांत आणले. अखेर कारची दारे कापून पाच मिनिटे आजी-आजोबांना कारमधून काढले आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले. यामुळे आजी-आजोबांचे प्राण वाचले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओसएसडी) डॉ. राहुल गेठे यांनी तत्परता दाखवत यंत्रणा वेगाने कार्यरत केली आणि आजी-आजोबांना नवजीवन दिल्याचे सांगितले जात आहे. आजी-आजोबाांना कारमधून काढणे शक्य होत नव्हते. अखेर कारची दारे कापून आजी-आजोबांना कारमधून काढले. त्यांना धीर दिला. डॉक्टर असलेल्या गेठेंनी आपले वैद्यकीय कौशल्यही दाखवत आजी-आजोबांवर प्राथमिक उपचार केले. या धाडसामुळे आजी, आजोबा आणि त्यांच्या मुलाचाही जीव वाचला. दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी तिघांवर मोफत उपचाराचा आदेशही दिला. 

सोमाटणे फाट्याजवळ भीषण अपघात झाला

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या कारला शनिवारी दुपारी सव्वातीन सोमाटणे फाट्याजवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता; सुसाट आलेली कार रस्त्यालगतच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि दुजाकाचा भलामोठा पत्रा काचेतून मागील बाजुला बसलेल्या आजी-आजोबांपर्यंत पोचला. कार 'लॉक' झाली. कारचा ड्रायव्हर बाहेर फेकला गेला. आजी-आजोबा आरडाओरड करू लागले; पण काही केल्या मदत मिळाली. तेवढ्यात डॉ. गेठेंनी अपघात पहिला आणि आपली गाडी थांबवून थेट आजी-आजोबांना बाहेर काढण्यासाठी धडपडले. तरीही, त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते. शेवटी आपत्कालीन यंत्रणा बोलावून कारचे दरवाजे कापून आजी-आजोबांना सुरक्षितपणे बाहेर काढले; भीषण अपघाताने प्रचंड घाबरलेल्या आजी-आजोबांना डॉ. गेठेंनीच जागेवर उपचार केले. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधून तिघांना पवना हॉस्पिटलमध्ये नेले. या तिघांवर तातडीने आणि योग्य उपचार होतील, यासाठी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. त्यानंतरच डॉ. निघून आले. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) असलेले डॉ. राहुल गेठे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहे. शिवाय, ते डॉक्टर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटातील डॉ. गेठे हे विश्वासू सहकारी आहेत. अपघात अडकलेल्या आजी-आजोबांवर उपचार करण्यापासून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेमके काय उपचार करायचे, हे त्यांना लगेचच सांगता आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cm eknath shinde osd dr rahul gethe save life of old age people who face fatal accident on mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.