Maharashtra Politics: “स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल”; CM शिंदेंचा राऊतांना नाव न घेता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:41 PM2023-02-22T16:41:42+5:302023-02-22T16:41:57+5:30

Maharashtra News: संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

cm eknath shinde replied on sanjay raut allegations and said if this is a stunt action will be taken | Maharashtra Politics: “स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल”; CM शिंदेंचा राऊतांना नाव न घेता इशारा

Maharashtra Politics: “स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल”; CM शिंदेंचा राऊतांना नाव न घेता इशारा

googlenewsNext

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. यावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. 

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा हटवण्यात आली याबाबत मी आधीच आपणास कळवले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देणारे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळवले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती तुम्हाला देत आहे, असे पत्र संजय राऊतांनी दिले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. 

स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल

संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास केला जाईल. जो दोषी असेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. आमच्याकडे पोलिसांची एक समिती आहे जी सुरक्षेचा आढावा घेते आणि ज्यांना जशी सुरक्षा गरजेची आहे, तशी सुरक्षा दिली जाते. परंतु जर कोणी स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्याविरोधातही कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

दरम्यान, संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार आहे.  सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cm eknath shinde replied on sanjay raut allegations and said if this is a stunt action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.