Maharashtra Politics: “सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 08:45 PM2022-11-12T20:45:22+5:302022-11-12T20:46:27+5:30

Maharashtra News: आम्ही ५० खोके घेणारे नाहीत, तर विकासासाठी २०० खोके देणारे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

cm eknath shinde slams shiv sena uddhav thackeray group and maha vikas aghadi govt over various issues | Maharashtra Politics: “सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे

Maharashtra Politics: “सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे

Next

Maharashtra Politics: राज्यात नवीन उद्योग उभारण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र माघारला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली. यावरून विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावाही केला जात आहे. विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेताना, सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. 

आमचे सरकार तीव्र गतीने काम करणारे आहे. त्यामुळे काहींना पोटशूळ उठत आहे. म्हणूनच राज्यातील सरकार पडणार, अशा वावड्या वारंवार उठवल्या जात आहे. स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी हे केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आम्ही ५० खोके घेणारे नाही, तर विकासासाठी २०० खोके देणारे आहोत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले. तसेच समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी दरम्यान काम पूर्ण झाले आहे. सर्वांचा आग्रह आहे की, समृद्धी महामार्ग नागपूरपासून पुढे भंडारा आणि गडचिरोलीपर्यंत आला पाहिजे. यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आमचे सरकार काम करणारे सरकार असून आम्ही राज्यात उद्योग आणू

सरकार पडेल याचे काहीच लॉजिक विरोधकांकडे नाही. फक्त स्वतःचे आमदार पक्षात टिकविण्याची धडपड करण्यात येत आहे. आमच्याकडे १७० आमदार आहेत. तसेच दररोज नवीन आमदार आणि खासदार आमच्यासोबत येण्यासाठी संपर्क साधत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. कोणताही मोठा प्रकल्प दोन तीन महिन्यात बाहेर जातो का किंवा राज्यात येतो का? ती काय जादूची कांडी आहे, अशी रोखठोक विचारणा करत, महाविकास आघाडी आपले पाप आमच्या माथ्यावर मारत आहे. आमचे सरकार काम करणारे सरकार असून आम्ही राज्यात उद्योग आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, गजानन कीर्तीकर आमच्याकडे आले आहेत. एक वरिष्ठ नेते खासदार आमच्याकडे आले. त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांचे मार्गदर्शन, त्याच्या कामाचा अनुभव याचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्राला होईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cm eknath shinde slams shiv sena uddhav thackeray group and maha vikas aghadi govt over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.