अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:54 PM2019-10-28T19:54:47+5:302019-10-28T19:55:05+5:30

राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

CM orders help to farmers affected by rain | अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next

मुंबई  - राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे. सध्या बऱ्याच भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले आहेत.

Web Title: CM orders help to farmers affected by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.