शिंदेंचे मंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा, हे पुढे येतेय; वडेट्टीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:00 PM2023-10-13T13:00:29+5:302023-10-13T13:00:57+5:30
राज्यात 1 लाख पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. 5 वर्षांचा कंत्राट, नोकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
टोल माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती एका जिल्ह्यापुरती टोल माफी नसावी. सर्व जिल्ह्यात असावी. त्याची अंमलबजावणी करावी. सत्ताकेंद्र बदलत आहे का? मुख्यमंत्री राज ठाकरेंकडे गेले. यावरून टोलचा झोल किती मोठा? हे पुढे येतेय, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
जाहिराती निडणुकीच्या तोंडावर का दिल्या? 31 कोटी रुपये का खर्च होतायत? विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. देशमुख कधी ओबीसी झाले? त्यांना कोणतीही जबाबदारी नसल्याने ही यात्रा आहे. ओबीसी आणि सरकार बैठकीचे मिनिटे अजून आले नाहीत. 30 दिवस होत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात 1 लाख पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. 5 वर्षांचा कंत्राट, नोकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? पोलीस सुरक्षेचे खाजगीकरण का करताय? राज्याची सुरक्षा व्यवस्था हे उध्वस्त करत आहेत. आमचे सरकार आले, तर मी तरुणांना आश्वस्त करतो की, मी त्यांना शासकीय नोकरीत घेईन, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.
अरबी समुद्रात शिवराजांचा पुतळा उभारला नाही. महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे लक्ष नाही, स्मारकबाबत काही हालचाली नाहीत. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस राहील. हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याला तडा गेलेला नाही. काँग्रेस मोठा भाऊ आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.