"लसीकरणानंतर स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीच्या संशोधनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:41 PM2021-03-11T19:41:50+5:302021-03-11T19:42:31+5:30

ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांच्यात आपण आता कोरोनापासून सुरक्षित आहोत अशी खोटी भावना निर्माण झाल्याने ते मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत आणि राजरोसपणे बाहेर मोकाटपणे फिरताना दिसतात. हे खूप धोकादायक आहे.

CM should take initiative for research on testing of spike protein antibodies after vaccination says Dr. Deepak Sawant | "लसीकरणानंतर स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीच्या संशोधनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा"

"लसीकरणानंतर स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीच्या संशोधनासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा"

Next

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  लस घेऊन चांगला पायंडा पाडला आहे. यामुळे भविष्यात मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी नागरिक पुढे येतील, असे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांनी म्हटले आहे. (CM should take initiative for research on testing of spike protein antibodies after vaccination says Dr. Deepak Sawant)

कोविड लस सध्या 45 वर्षांवरील लोकांसाठी उपलब्ध आहे. मात्र ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांच्यात आपण आता कोरोनापासून सुरक्षित आहोत अशी खोटी भावना निर्माण झाल्याने ते मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत आणि राजरोसपणे बाहेर मोकाटपणे फिरताना दिसतात. हे खूप धोकादायक आहे. यामुळे परिस्थिती अधिक खराब होण्याची शक्यता आहे.

दुसरे असे की, ज्यांनी लस घेऊन 57 दिवस पूर्ण होऊन अधिक काळ झाला आहे. त्यांच्यात स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीचे संशोधन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध वयोगटासाठी योग्य लसीची योग्यतासुद्धा सांगता येईल. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पाईक प्रोटिन्स अँटीबॉडीजच्या चाचणीच्या संशोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे.

याबाबत आपण मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशीदेखिल चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: CM should take initiative for research on testing of spike protein antibodies after vaccination says Dr. Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.