"घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची", उद्धव ठाकरेंचा कंगनावर हल्लाबोल
By Ravalnath.patil | Published: October 25, 2020 08:27 PM2020-10-25T20:27:44+5:302020-10-25T21:00:56+5:30
Uddhav Thackeray’s speech at Dussehra melava : दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले. तसेच, कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याऱ्या अभिनेत्री कंगना राणौतचा चांगला समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला.
दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले. तसेच, कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले.
याचबरोबर, मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या ते सगळ्या जगाने पाहिले असेही ते म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.
- वाटेला जात तर मुंगळा कसा डसतो, ते दाखवू.
- वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल.
- महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन.
- मला संयमचे महत्त्व कळतं.
- मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय.
- वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारचं.
- घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व.
- बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर प्रश्न विचारतायेत.
- इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता, गोव्यात गोवंश बंदी का नाही
- सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, भाजपाला टोला
- राजकारण म्हणजे शस्त्रूमधील युद्ध नव्हे, हे सरसंघचालकाकडून शिकावे.
- गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
- देश संकटात आहे आणि हे राजकरण करत आहे.
- कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून?
- आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही?
- जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावी .
- सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी.
- जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी..
-संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात
- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.
- सेक्युलरपणाची लस कुणी कुणाला?
- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.
- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं.
- बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?
- महाराष्ट्र पुढं जातोय म्हणून बदनामी करायची.
- मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे .
- छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान.
- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे .
- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, उद्धव ठाकरेंचा कंगनावर प्रहार
- आमच्या अंगणात तुळशीची वृंदावने आहेत, गांजाची वृंदावने नाहीत.
- आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा .
- आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत.
- तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय
- बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार
- केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे
- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत
- महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही.