भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:58 PM2022-06-08T20:58:59+5:302022-06-08T20:59:19+5:30

हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray criticism of Raj Thackeray and BJP over Mosque loudspeakers | भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

भाजपानं सुपारी दिली अन् भोंगा पुढे आला; उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर टीका

googlenewsNext

औरंगाबाद - आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आज जे काही चालले आहे. भाजपा आणि त्यांचे प्रवक्ते त्यांच्या डोक्यातील मेंदूत अक्कल घातली पाहिजे. जर तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली आणि आमचा संयम सुटला तर तुमच्यात भाषेत टीका केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. भगवा हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा आहे. भगव्यामागे जो विचार, संस्कार आहेत ते आमच्या कृतीत दिसणार नसेल तर त्याचा काय उपयोग? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. 

औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, निवडणुका आल्यानंतर धर्माच्या अफूची गोळी द्यायची. मते मागायची. मुद्दे भरकटवले जातायेत. देशातील सर्व पक्षाच्या प्रमुखांना बोलावून कुठल्या मुद्द्यावर बोलायचं हे ठरवू. परंतु त्यावर अंमलबजावणी करायला हवी. गुन्हा भाजपाच्या तीनपाट प्रवक्त्याने केला आहे. भाजपाची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. हिंदुस्थाननं माफी मागावी ही नामुष्की देशावर ओढावली आहे. देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवर लावण्यात आला हे अजिबात पटणारे नाही असं त्यांनी सांगितले. 



तसेच हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबरी मशीदीचं आंदोलन करताना जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा नारा होता. बाबरी पाडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तुम्ही संसदेत कायदा केला नाही. तुमचं हिंदुत्वासाठी कर्तृत्व काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

त्याचसोबत आज सगळंकाही ठीक असताना भाजपा कुणालातरी सुपारी देते, हनुमान चालीसा पुढे आणते, भोंगा आणतं, थडग्यावर नतमस्तक व्हायला लावतं. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष आम्ही करत नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 

Web Title: CM Uddhav Thackeray criticism of Raj Thackeray and BJP over Mosque loudspeakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.