'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 02:56 PM2020-01-28T14:56:43+5:302020-01-28T14:59:12+5:30

मी कधी श्रेय घेतलं नाही आणि आम्हाला घ्यायचे देखील नाही.

CM Uddhav Thackeray flagged off the Nagpur Metro Aqua Line through video conference | 'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो' 

'एका गाडीत बसलो नाही तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो' 

googlenewsNext

नागपूर: बहुप्रतिक्षित लोकमान्यनगर ते बर्डी या अ‍ॅक्वामार्गावर मेट्रोची सेवा आजपासून सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या मेट्रो सेवेचे उद्घाटन केले. मेट्रोचे उद्घाटन करण्याआधी उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहे. 

महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

उद्धव ठाकरे यांनी मेट्रोचे उद्घाटन करण्याआधी भाषण केले. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचा मित्र म्हणून उल्लेख करत आपण एका गाडीत बसलो नसलो तरीही एका स्टेशनवर एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच एकमेकांचा हात, एकमेकांची साथ कामच्याबाबतीत आपण सोडणार नाही हा माझा विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मी कधी श्रेय घेतलं नाही आणि आम्हाला घ्यायचे देखील नाही. आम्हाला फक्त जनतेचा आशिर्वाद हवा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागपूरात सुरु असलेले अनेक प्रकल्प कधीच थांबवले जाणार नसल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसचे काम पूर्ण केल्यामुळे नितीन गडकरींचे देखील उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. 

महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेनेने दिला भाजपाला पाठिंबा

सीताबर्डी ते लोकमान्यनगर या साडेअकरा किमी मार्गावरील सहा मेट्रो स्टेशन तयार झाले आहेत. हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर, सुभाषनगर, आयओई (इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग), झाशी राणी चौक, सीताबर्डीनंतर आता मेट्रोचे वासुदेवनगर स्टेशनही तयार झाले आहे. वासुदेवनगरला 'सीएमआरएस'चे प्रमाणपत्रही नुकतेच मिळाले. या सहा स्टेशनवर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

पुढचा स्टॉप IAS ! बस कंडक्टरने पास केली UPSC ची मुख्य परीक्षा

महत्त्वाच्या बातम्या

...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही'

चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका 

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त 

धक्कादायक...! देशात 5 महिन्यांत चाईल्ड पॉर्नचा आकडा 25 हजारांवर; मुंबई, पुणे आघाडीवर

Web Title: CM Uddhav Thackeray flagged off the Nagpur Metro Aqua Line through video conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.