CM Thackeray on Lockdown: मुख्यमंत्री ठाकरेंकडून लॉकडाऊनचे संकेत; एक दोन-दिवसांत निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:55 IST2021-03-11T13:39:13+5:302021-03-11T13:55:32+5:30
cm uddhav thackeray hints about lockdown: काही भागांत लॉकडाऊन लागू करावा लागेल; मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट संकेत

CM Thackeray on Lockdown: मुख्यमंत्री ठाकरेंकडून लॉकडाऊनचे संकेत; एक दोन-दिवसांत निर्णय घेणार
मुंबई: राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानं धोका वाढला आहे. त्यामुळे काही भागांत प्रशासनानं निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (CM Uddhav Thackeray on Lockdown)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला. त्यावर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागले. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजानं लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
'ठाकरे सरकार' हे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'लबाड सरकार'; देवेंद्र फडणवीस कडाडले
मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कोरोनाची लस अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही बाळगू नये. मनात कोणताही किंतु-परंतु आणू नका. लस घेण्यास पात्र ठरल्यानंतर निश्चिंतपणे लस घ्या. त्यासोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियमदेखील पाळा,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय; मुख्यमंत्री ठाकरेंची टीका
मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाची लस घेत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीदेखील कोरोनाची लस घेतली. उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे.