सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही?; भाजपाच्या निर्णयाला 'ठाकरे सरकार'चा दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:47 PM2019-12-16T18:47:45+5:302019-12-16T18:50:27+5:30

फडणवीसांचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारच्या रडारवर

cm uddhav thackeray likely to cancel devendra fadnavis government decision about electing sarpanch and mayor of nagar parishad | सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही?; भाजपाच्या निर्णयाला 'ठाकरे सरकार'चा दे धक्का

सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही?; भाजपाच्या निर्णयाला 'ठाकरे सरकार'चा दे धक्का

Next

मुंबई: मेट्रो, बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. यानंतर आता ठाकरे सरकार फडणवीसांच्या आणखी एका निर्णयाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. जनतेमधून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत फडणवीसांनी सुरू केली. याबद्दलचं विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. 

पूर्वी ग्रामपंचायत सदस्य सरपंचाची निवड करायचे. तर नगरसेवकांकडून नगराध्यक्षांची निवड केली जायची. मात्र फडणवीस सरकारनं ही पद्धत बंद करत थेट जनतेमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडण्याची पद्धत सुरू केली. मात्र आता ही पद्धत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून बंद केली जाणार आहे. याशिवाय मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभागांची पद्धतदेखील रद्द केली जाणार आहे. आधीसारखीच एक प्रभाग एक पद्धत लागू करण्याच्या दृष्टीनं नव्या सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत.
 
जनतेमधून सरपंच, नगराध्यक्षांची निवड आणि नगरपालिकांमध्ये चार प्रभागांची पद्धत हे दोन्ही निर्णय अडीच वर्षांपूर्वी भाजप सरकारनं घेतले होते. मात्र आता उद्धव ठाकरे सरकार हे दोन्ही निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची, मात्र नगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा अशी अवस्था आहे. त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतो. याच कारणामुळे हे दोन्ही निर्णय रद्द केले जाणार असल्याचं समजतं. 
 

Web Title: cm uddhav thackeray likely to cancel devendra fadnavis government decision about electing sarpanch and mayor of nagar parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.