लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:47 PM2020-06-02T15:47:39+5:302020-06-02T15:48:20+5:30

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे पाचव्या क्रमांकावर; पहिल्या पाचांत भाजपाचा एकही मुख्यमंत्री नाही

cm Uddhav Thackeray more popular than delhi cm arvind kejriwal shows survey kkg | लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...

googlenewsNext

मुंबई: प्रशासनाचा फारसा प्रत्यक्ष अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोरोना संकट हाताळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडादेखील सर्वाधिक आहे. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंची लोकप्रियता चांगली असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तीनच महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमतानं दिल्लीतील सत्ता राखणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा ठाकरेंची लोकप्रियता जात असल्याचं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.

सी व्होटर संस्थेनं देशातील नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ६६ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तर २३ टक्के लोकांनी राहुल यांना पसंती दिली. देशातली सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ३ हजारहून जणांची मतं सी-व्होटरनं विचारात घेतली. यामधून मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा आढावादेखील घेण्यात आला. 

सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओदिशाचे नवीन पटनायक पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता जवळपास ८३ टक्के इतके आहेत. त्यांच्यानंतर छत्तीसगडचे भूपेश बघेल (८१ टक्के), केरळचे पिनरायी विजयन (८० टक्के), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (७८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी (७६ टक्के) आहेत. ठाकरे यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. त्यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या सहा नावांमध्ये एकही मुख्यमंत्री भाजपाचा नाही.

अतिशय कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत हरयाणाचे मनोहर लाल खट्टर पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता केवळ ४.४७ टक्के आहे. त्यानंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत (१७.७२ टक्के), पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग (२७.५१ टक्के), बिहारचे नितीश कुमार (३०.८४ टक्के), तमिळनाडूचे पलानीस्वामी (४१.२८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन

...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

Read in English

Web Title: cm Uddhav Thackeray more popular than delhi cm arvind kejriwal shows survey kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.