Maharashtra Political Crisis: राजीनामा द्यायचा की नाही, निर्णय ठाकरेंनी घ्यावा; एकनाथ शिंदे जरा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:09 PM2022-06-22T15:09:25+5:302022-06-22T15:10:03+5:30

सायंकाळपर्यंत आमदारांची बैठक घेऊन पुढील भूमिका कळविली जाईल, असेही शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत, हिंदुत्व ही आमची भूमिका आहे, असेही शिंदे म्हणाले.

CM Uddhav Thackeray should decide whether to resign or not; Eknath Shinde spoke quite clearly revolt | Maharashtra Political Crisis: राजीनामा द्यायचा की नाही, निर्णय ठाकरेंनी घ्यावा; एकनाथ शिंदे जरा स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: राजीनामा द्यायचा की नाही, निर्णय ठाकरेंनी घ्यावा; एकनाथ शिंदे जरा स्पष्टच बोलले

googlenewsNext

आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्य़ाबळ झालेले आहे. आणखी काही आमदार येत आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा की नाही, हा निर्णय ठाकरेंनी घ्यावा, अशा शब्दांत शिवसेनेत बंड पुकारलेले नेते एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

सायंकाळपर्यंत आमदारांची बैठक घेऊन पुढील भूमिका कळविली जाईल, असेही शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत, हिंदुत्व ही आमची भूमिका आहे, असेही शिंदे म्हणाले.
शिवसेनेचा वाघ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील देखील गुवावाहाटीला निघाल्याचे समजते आहे. यानंतर शिवसेनेने ठेवलेल्या हॉटेलमधील काही आमदार देखील सायंकाळी गुवाहाटीला निसटण्याची शक्यता आहे. तसेच अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून मुंबईसाठी निघतोय असे सांगत गुवाहाटी गाठली आहे.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. त्याच्याशी कदापीही तडजोड केली जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्यासोबत ४६ आमदार आहेत, आणखी काही येत आहेत. आमचे सहकारी पक्षाचे आमदारही यात आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Read in English

Web Title: CM Uddhav Thackeray should decide whether to resign or not; Eknath Shinde spoke quite clearly revolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.