गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 03:03 PM2021-06-26T15:03:11+5:302021-06-26T15:03:47+5:30

Uddhav Thackeray: भाजपनं आज राज्यभर केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

cm uddhav thackeray slams bjp over todays protest obc reservation | गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलामराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंचं कौतुकभाजपच्या आजच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा

Uddhav Thackeray: कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे. पण सरकार जर तुमचं ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येनं समाजाला रस्त्यावर उतरवायचं आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेचे संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केला आहे. 

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू छत्रपती, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात मराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं कौतुक केलं. संभाजीराजेंचं कौतुक करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला. 

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

"कोरोनाचं संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्न समोर आहे हे मान्य आहे. पण संघर्षाला रस्त्यावर उतरायचं, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचं रक्षण चहुबाजुंनी करतो. आर्थिक आरक्षण, राजकीय आरक्षण, नोकरीत आरक्षण हा जसा न्यायहक्क आहे. तसा समाजाच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली नंतर साथ पसरली तर ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाला रस्त्यावर उतरू न देता अतिशय समजुतदारपणाने समाजाला शांत राहण्याचं आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे आभार व्यक्त केले. 

"आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read in English

Web Title: cm uddhav thackeray slams bjp over todays protest obc reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.