शिवसेना एक धगधगता निखारा, पाय ठेवाल तर जळाल- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 03:45 PM2022-06-25T15:45:07+5:302022-06-25T15:45:15+5:30
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना एक निखारा आहे, त्यावर पाय ठेवाल तर जळाल असा इशारादेखील त्यांनी दिला.
स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय आधी घेऊ द्या, माझ्यावर शिवसैनिकांचं अधिक प्रेम आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका अशी मागणी केली. यावर उत्तर देताना त्यांना परत घेणारच नसल्याचं स्पष्ट केलं.
Mumbai | Some people are asking me to say something but I've already said that they(rebel MLAs) can do whatever they want to do, I won't interfere in their matters. They can take their own decision, but no one should use Balasaheb Thackeray's name: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/55PkAI8irW
— ANI (@ANI) June 25, 2022
काही लोक मला काही बोलण्यास सांगत आहेत. त्यांना (बंडखोर) जे करायचं आहे ते करू द्या. त्यांना आपला निर्णय घेऊ द्या. मी त्यांच्यात हस्तक्षेप करणार नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर कोणीही करू नये, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.