Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:41 PM2021-05-04T19:41:02+5:302021-05-04T19:45:28+5:30

पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील असं कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

CM Uddhav Thackeray thanks Paytm giver help to Maharashtra in Corona situation | Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

Uddhav Thackeray: “आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. ‘त्या’ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही”

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेतराज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. . राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी

मुंबई - विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात आहे. पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील असं कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

त्याचसोबत पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहे. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत. पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

पेटीएम फाऊंडेशनचा पुढाकार..

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

 

Web Title: CM Uddhav Thackeray thanks Paytm giver help to Maharashtra in Corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.