"25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:25 PM2021-04-05T21:25:36+5:302021-04-05T21:26:10+5:30

CM Uddhav Thackeray writes to PM Modi requesting him to allow vaccination of all above the age of 25 years : मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती.

CM Uddhav Thackeray writes to PM Modi requesting him to allow vaccination of all above the age of 25 years | "25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती 

"25 वर्षांवरील सर्वांना लस द्या", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती 

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई : कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. (CM Uddhav Thackeray writes to PM Modi requesting him to allow vaccination of all above the age of 25 years CM also thanked PM Modi for accepting his proposal of allowing all persons above 45 yrs of age to be made eligible for #COVID19 vaccination: Maharashtra CMO)

मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पाउले उचलत आहेत याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


याचबरोबर, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा,  उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी  आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील, अशी कार्य पद्धती ठरविली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिली.  

दीड कोटी डोस मिळावेत
लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत.

केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: CM Uddhav Thackeray writes to PM Modi requesting him to allow vaccination of all above the age of 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.