"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 03:50 PM2023-01-06T15:50:16+5:302023-01-06T15:50:53+5:30

नारायण राणे हा पादरापावटा आहे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोललो नाही. सगळ्यांना अरे तुरे करतो तू कोण आहे? याची चौकशी करा अशी मागणी करत संजय राऊतांनी एकेरी भाषेत राणेंवर हल्लाबोल केला.

"CM Yogi Adityanath came to Mumbai and took away investments worth 5 lakh crores, Sanjay Raut Target CM Eknath Shinde, Narayan Rane | "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले"

"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले"

Next

मुंबई - शिंदे गटात कोण गेले? हे सगळे बेनामी आहेत. शिवसेनेच्या महावृक्षाखाली पडलेला कचरा गोळा करून त्याच्यासमोर राज्याचे मुख्यमंत्री भाषण करतात हे फार गमंतीशीर आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आणि ५ लाख कोटींचे गुंतवणूक घेऊन गेले. तुम्ही काय करताय? कुठे आहात? अयोध्येत एक भूखंड दिला त्यात खुश. त्याबदल्यात ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. आवाज काढला का? असा सवाल करत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत ठाकरे गट वैगेरे नाहीत. ते गट त्यांच्याकडे. कचरा कुणीतरी घेऊन जातो. ते जाऊ द्या. संघटनात्मक कामं असल्याने नाशिकला आहे. राऊत येणार म्हणून कचरा गोळा करणार त्याने आम्हाला धक्का बसतो का? तर अजिबात नाही असं त्यांनी सांगितले आहे. 

नारायण राणे, माझ्या नादी लागू नको
नारायण राणे हा पादरापावटा आहे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल काही बोललो नाही. सगळ्यांना अरे तुरे करतो तू कोण आहे? याची चौकशी करा. कालपर्यंत मी संयमाने वागलो आता यांची प्रकरणं बाहेर काढतो. मोदींना अरे तुरे बोलत होते. डरपोक लोक आहेत. तुम्ही पळून गेला. किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्यावर उत्तर दिले का? नारायण राणे, माझ्या मागे लागू नकोस. तुझ्यासारखे ५६ आले आणि गेले. मर्यादेत राहायचं. नामर्द माणूस आहे. ईडी, सीबीआयच्या भीतीने तू पळून गेलास तुझी लायकी आहे का अशा शब्दात संजय राऊतांनी नारायण राणेंवर प्रहार केला आहे. 

त्याचसोबत नारायण राणे वेड्यांच्या कळपात आहे. त्याची सटकली आहे. त्याला वेड लागलंय. मी त्याला कालपर्यंत आदराने बोलत होतो. त्याच्यावर एकही शब्द बोललो नाही. शिंदे गटातील माणसाला केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी नारायण राणेंचे मंत्रिपद जातंय. त्यामुळे तो भैसाटला आहे. अजित पवारांनी समर्थक उपमा दिली. त्यांची बुद्धी टिल्लीच आहे. हा प्रश्न शरिरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. तू ये नाहीतर तुझी पोरं येऊदे. ये मैदानात. केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय. स्वत:ला मोठा भाई समजतो असंही संजय राऊत म्हणाले. 
 

Web Title: "CM Yogi Adityanath came to Mumbai and took away investments worth 5 lakh crores, Sanjay Raut Target CM Eknath Shinde, Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.