क्रीमिलेयअरची मर्यादा सहा लाख करणार

By admin | Published: July 21, 2016 04:36 AM2016-07-21T04:36:48+5:302016-07-21T04:36:48+5:30

ओबीसींच्या क्रीमिलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख करण्यात येईल व त्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपण्याच्या आतच घेतला जाईल

Cmillier's limit is six lakh | क्रीमिलेयअरची मर्यादा सहा लाख करणार

क्रीमिलेयअरची मर्यादा सहा लाख करणार

Next


मुंबई : ओबीसींच्या क्रीमिलेअरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख करण्यात येईल व त्याबाबतचा निर्णय अधिवेशन संपण्याच्या आतच घेतला जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिले.
अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय आदींच्या शिष्यवृत्तीसंबंधीच्या लक्षवेधीवर चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला. तोच धागा पकडून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बडोले यांची चांगलीच अडचण केली. सध्या शाळा, कॉलेजांच्या प्रवेशांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे क्रीमिलेयरची मर्यादा साडेचार लाखावरुन ६ लाख किती दिवसात करणार? याचे नेमके उत्तर द्या, तसेच विद्यार्थ्यांच्या फीची प्रतिपूर्ती झाली नाही, तर पुढच्या वर्षात त्यांना प्रवेश देण्यासाठी संस्थाचालक अडचणी निर्माण करतात. पहिली फी भरली नाही तर पुढच्या वर्षीचे प्रवेश देत नाहीत, यावर काय करणार? असा सवाल खडसे यांनी केला. खडसेंच्या या प्रश्नाने सत्ताधारी बाकावर शांतता पसरली, पण विरोधी बाकांवरुन जोरदार स्वागत झाले.
प्रश्नाच्या सरबतीमुळे भांबावलेल्या मंत्र्यांनी महिन्याभरात निर्णय घेऊ, असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत प्रवेश प्रक्रीया संपून जाईल, असे पुन्हा खडसे म्हणाले. शेवटी मत्रिमंडळापुढे हा विषय नेण्यात येईल आणि अधिवेशन संपण्याच्या आत या विषयावर निर्णय घेतला जाईल, असे उत्तर बडोले यांनी दिले. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती झालेली नाही ; त्यांना प्रवेशात अडचणी निर्माण करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
>असे झाले वाटप
राज्यात २०१५-१६ या वर्षात १६,८३,७८४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्तीसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैेकी जुलै २०१६ मध्ये १३,४९,४५५ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झाले असून १२,१९९ अर्ज नाकारले असून ३,२२,१३० अर्ज प्रलबित असल्याचे बडोले म्हणाले. यापैकी १,६७,७२४ अर्ज महाविद्यालयांच्या पातळीवर आणि १,५४,४०६ अर्ज जिल्हा पातळीवर प्रलंबित आहेत. यासाठी ३०७८.८९ कोटींची तरतूद करण्यात आली असून २५३२.७० कोटी एवढा खर्च आजपर्यंत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Cmillier's limit is six lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.