मुख्यमंत्र्यांची लोणार सरोवर काठावर मोबाईल फोटोग्राफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:28 PM2021-02-05T18:28:50+5:302021-02-05T18:29:30+5:30

Uddhav Thakre at Lonar मुख्यमंत्र्यांची लोणार सरोवर काठावर मोबाईल फोटोग्राफी केली.

CM's mobile photography on the shores of Lonar Lake | मुख्यमंत्र्यांची लोणार सरोवर काठावर मोबाईल फोटोग्राफी

मुख्यमंत्र्यांची लोणार सरोवर काठावर मोबाईल फोटोग्राफी

Next

बुलडाणा: छायाचित्रकाराचा मुळ पींड असलेल्या मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भाने शुक्रवारी लोणार सरोवरास भेट दिली. तेव्हा त्यांच्यातील छायाचित्रकार जागा झाला आणि सरोवर काढावर जवळपास २००४ नंतर त्यांनी प्रथमच फोटोग्राफी केली.सकाळी वनकुटी व्युव्ह पॉईंटवर पोहोचल्यानंतर स्वत:चा मोबाईल त्यांनी बाहेर काठत सरोवराचे एक आकर्षक असे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. याच ठिकाणी त्यांनी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सेल्फी काढण्याचे कसबही शिकवले. दरम्यान पौराणिक महत्त्व असलेल्या धारतिर्थावरही त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सरोवराचे विहंगम दृष्य कैद केले. दरम्यान शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरावरील शिल्पकलेचे ही छायाचित्र मुख्यमंत्र्यांनी काढले. गेल्या दीड महिन्यापासून मुख्यमंत्री विदर्भात फिरत असून भंडारा येथील दुर्दवी घटनेप्रसंगी दिलेली भेट वगळता गोसेखुर्द प्रकल्प, समुद्धी महामार्गाची पाहणी यासह अन्य काही ठिकाणी भेटी देवून तेथील विकास कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले.

लोणार येथेही त्याच दृष्टीकोणातून ते आले होते. मात्र खाऱ्या पाण्याचे विलोभनीय दृष्य पाहून त्यांच्यातील छायाचित्रकारही जागा झाला व त्यांनी सरोवराचे विविध अँगलमधून छायाचित्रही काढले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दोघांना बसलवले एका सेल्फीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सेल्फी घेण्याचे कसब अवगत केलेल्या अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सेल्फी काढण्याचे कसब मग धारतिर्थावरही दाखवले. तेथे चक्क त्यांनी एका सेल्फीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आपणही सेल्फीत निष्णात झाल्याचे दाखवले.

Web Title: CM's mobile photography on the shores of Lonar Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.