सीएनजीच्या स्फोटात भंगार विक्रेत्याचा मुलासह मृत्यू
By admin | Published: June 24, 2017 04:08 AM2017-06-24T04:08:01+5:302017-06-24T04:08:01+5:30
भंगारात घेतलेल्या सीएनजीच्या टाकीतून पितळ काढत असताना भीषण स्फोट होऊन भंगार व्यावसायिकाचे घर भस्मसात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंगारात घेतलेल्या सीएनजीच्या टाकीतून पितळ काढत असताना भीषण स्फोट होऊन भंगार व्यावसायिकाचे घर भस्मसात झाले. १६ जूनच्या दुपारी ३.३० च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत व्यावसायिकासह त्याच्या मुलाचा मृत्यू झाला, तर पत्नी- मुलीसह पाच जण जबर जखमी झाले आहे.
शेख शकील शेख बशीर (५५) हा भंगार व्यावसायिक मोठा ताजबागमधील हिरालाल सोसायटीतील प्यारे पहेलवानच्या चाळीत भाड्याने राहात
होता. वाहनाला लावली
जाणारी सीएनजीची टाकी त्याने भंगारात घेतली होती. त्यातून
पितळ काढत असतानाच त्याची
पत्नी साबिरा रोम हिने स्टोव्ह पेटवला. त्यामुळे टाकीतील गॅसचा
भडका उडाला. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २० जूनला रात्री ८.४० वाजता चिमुकला रशीद, तर २१ जूनला रात्री ९ च्या सुमारास शकिलचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत.