सहकारी संस्थांची नोंदणी आता होणार आॅनलाईन

By admin | Published: June 18, 2015 02:06 AM2015-06-18T02:06:38+5:302015-06-18T02:06:38+5:30

राज्यात अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांचा कारभार यापूर्वीच आॅनलाईन करण्यात आला आहे. आता सहकारी संस्थांची नोंदणीसुध्दा आॅनलाईन करण्यात येणार आहे.

Co-operative institutions will now get online registration | सहकारी संस्थांची नोंदणी आता होणार आॅनलाईन

सहकारी संस्थांची नोंदणी आता होणार आॅनलाईन

Next

बुलडाणा : राज्यात अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांचा कारभार यापूर्वीच आॅनलाईन करण्यात आला आहे. आता सहकारी संस्थांची नोंदणीसुध्दा आॅनलाईन करण्यात येणार आहे. याद्वारे सहकार खात्यात पारदर्शकता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे संस्थेचे लेखा परीक्षण, वार्षिक आणि आमसभा असा लेखाजोखा सहकार विभागाच्या वेबसाईटवर यापुढे पहायला मिळणार आहे. दीडशे सहकारी संस्थांचा यात समावेश आहे.
सहकार विभागाच्या निर्णयानुसार आता प्राथमिक शेती संस्था, नोकरदार, पतपुरवठा संस्था, ग्रामीण, नागरी, इतर नागरी पतसंस्था, इतर ग्रामीण उद्योग, विद्यार्थी ग्राहक भांडार, ग्रामीण व नागरी गृहनिर्माण सहकारी संस्था, पाणी वापर संस्था, उपसा जलसिंचन, सूतगिरणी इतर प्रक्रिया तसेच दीडशे नावीण्यपूर्ण सहकारी संस्था स्थापन करताना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. राज्यातील सहकारी संस्थांचा कारभार यापूर्वीच आॅनलाईन झाला आहे. लेखा परीक्षण, वार्षिक व आमसभा आदी लेखाजोखा सहकार विभागाच्या वेबसाईटवर पहायला मिळत आहे. आता कोणत्या तालुक्यातून किती संस्थांची नोंदणी होत आहे,संस्थेची नोंदणी झाली याची संपूर्ण माहिती आॅनलाईन मिळेल.

Web Title: Co-operative institutions will now get online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.