कोचिंग क्लासेस आणि कॉलेजवर आयकर धाडी
By admin | Published: August 8, 2015 01:38 AM2015-08-08T01:38:18+5:302015-08-08T01:38:18+5:30
आयकर विभागाने सलग दोन दिवस शहरातील चार नामांकित कोचिंग क्लासेस आणि पाच कॉलेजवर छापे टाकून सर्वेक्षण केले. यामध्ये आक्षेपार्ह आणि संशयास्पद व्यवहाराची
नागपूर : आयकर विभागाने सलग दोन दिवस शहरातील चार नामांकित कोचिंग क्लासेस आणि पाच कॉलेजवर छापे टाकून सर्वेक्षण केले. यामध्ये आक्षेपार्ह आणि संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
आयकर विभागाने बुधवारी आणि गुुरुवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये प्रीती जगदीश अग्रवाल यांचे
प्रीती अग्रवाल कोचिंग क्लासेस, आशिष जयस्वाल यांचे ए.बी. जिचकार आयडीयल अकॅडमी आॅफ सायन्स, अमित जिचकार यांचे आयआयटी-पॉर्इंट आणि सारंग उपगन्लावार, प्रकाश उपगन्लावार, प्रियदर्शिनी उपगन्लावार यांच्या आयकॅड स्कूल आॅफ लर्निंग
या कोचिंग क्लासेसचा तर,
मारोतराव मुळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेजर हेमंत जकाते ज्युनिअर कॉलेज, कोराडी येथील तायवाडे कॉलेज, सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज आणि अतुलेश कॉन्व्हेंट आणि ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश आहे. या कोचिंग क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजच्या ३७ ठिकाणी विभागाने छापे टाकले.
आयकर विभागाच्या या कारवाईत मुंबई, नागपूर, कोटा, अमरावती, अकोला येथील १५०
पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत संपूर्णत: मौन पाळले; पण कोचिंग क्लासेसच्या सूत्रांनी कारवाईला दुुजोरा दिला.
या कारवाईत अधिकाऱ्यांनी अघोषित संपत्ती आणि अनेक बँकांतील लॉकर्सही ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. आयकर विभागाच्या कारवाईने कोचिंग
क्लास मालकांचे आणि शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)