कोळशामुळे वीजनिर्मिती प्रकल्प बंद - पीयूष गोयल

By admin | Published: July 6, 2014 12:38 AM2014-07-06T00:38:45+5:302014-07-06T00:38:45+5:30

कोळसापुरवठा आणि इतर समस्यांमुळे देशातील 65 हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बंद आहेत. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाली

Coal power projects closed - Piyush Goyal | कोळशामुळे वीजनिर्मिती प्रकल्प बंद - पीयूष गोयल

कोळशामुळे वीजनिर्मिती प्रकल्प बंद - पीयूष गोयल

Next
मुंबई : कोळसापुरवठा आणि इतर समस्यांमुळे देशातील 65 हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प बंद आहेत. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाली तरच प्रत्येक घराला रास्त दरात पूर्णवेळ वीजपुरवठा करण्यात येईल, असे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
 मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कार्यकत्र्याशी गोयल यांनी बातचित केली. ते म्हणाले, इंधन पुरवठय़ाअभावी कोळशाचे 4क् हजार मेगावॅटचे तर गॅसवर आधारित 25 हजार मेगावॅटचे वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. या प्रकल्पात साडेतीन ते चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  हे प्रकल्प पुनरुज्जीवित केले, वीजवहनावर लक्ष दिले व ऊर्जा क्षेत्रची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही प्रश्न सोडविले तर देशात विजेचा तुटवडा भासणार नाही.
विजेचे दर ठरविण्याचे काम नियामक आयोग करतो. परंतु, केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्रची कार्यक्षमता वाढविण्याचे काम केले आणि संबंधित राज्य सरकारांनी सहकार्य केले तर वीजदर वाढविण्याची गरज पडणार नाही. उलट आयोगाला वीजदर कमी करावे लागतील. देशात प्रत्येक घराला दिवसाचे 24 तास दररोज वीज मिळावी, शेती व उद्योगाला गरजेनुसार वीज मिळावी हे आमचे स्वप्न आहे. पाच वर्षात आम्ही डिङोल जनरेटर व इन्वर्टरपासून मुक्ती देऊ शकलो तर मोदी सरकारची ती देशाला सर्वात मोठी देणगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Coal power projects closed - Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.