कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त, कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 08:26 AM2024-09-07T08:26:14+5:302024-09-07T08:26:44+5:30

कोळसा वॉशरीजमधील भ्रष्टाचाराच्या दलदलीची साफसफाई सुरू झाली आहे. महाजेनकोने तपासाचे आदेश दिल्यानंतर, नोडल एजन्सी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनने कोळशावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेली ऑडिट एजन्सी प्राइमस सॅम प्रा.ला बडतर्फचे आदेश दिले.

Coal Regulatory Agency finally disbanded, iron filings mixed with coal case | कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त, कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण

कोळसा देखरेख करणारी एजन्सी अखेर बरखास्त, कोळशामध्ये लोखंडाचा चुरा मिसळण्याचे प्रकरण

- कमल शर्मा
नागपूर - कोळसा वॉशरीजमधील भ्रष्टाचाराच्या दलदलीची साफसफाई सुरू झाली आहे. महाजेनकोने तपासाचे आदेश दिल्यानंतर, नोडल एजन्सी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनने कोळशावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेली ऑडिट एजन्सी प्राइमस सॅम प्रा.ला बडतर्फचे आदेश दिले. कोल वॉशरीजद्वारे कोळशामध्ये लोखंडाच्या चुऱ्याची भेसळ केली जात असल्याचे यावरून सिद्ध होते. 

‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित करून कोळसा वॉशरीच्या नावाखाली ‘काळ्या सोन्या’तून कमावल्या जाणाऱ्या काळ्या पैशाचा पर्दाफाश केला. यात  लेखापरीक्षणासाठी गठीत थर्ड पार्टीतही आपलेच लोक असल्यावर प्रकाश टाकत एजन्सींच्या कारभाराकडे लक्ष वेधले.   मालिकेची दखल घेत महाजेनकोने एमएसएमसीला चौकशीचे आदेश दिले. आता एमएसएमसीला मॉनिटरिंग एजन्सी प्राइमसला बरखास्तच्या सूचना दिल्या.  लेखा परीक्षणासाठी गठीत ‘थर्ड पार्टी’ही कोल वॉशरीजच्या कर्त्याधर्त्यांचीच आहे. रिजेक्ट कोळशाच्या नावावर खेळ होत आहे त्याचा पर्दाफाश करण्यास एजन्सीही टाळाटाळ करीत आहे.

 पत्रात गंभीर खुलासे
 एमएसएमसीने एक्सकीनो कॅपिटल सर्विसेसमार्फत प्राइमसला कोल वॉशरीजच्या देखरेखीचे काम सोपविले होते. एक्सकीनोला दिलेल्या पत्रात  एमएसएमसीचे महाव्यवस्थापक पी.वाय. टेंभरे यांनी नमूद केले की, वारंवार प्राइमसला इशारा देऊनही सुधारणा झाली नाही. वृत्तपत्रातील वृत्तांचा संदर्भ देत,  प्राइमसने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. वॉररूमच्या स्थापनेपासून ते वॉशरीज, खाणी आणि सायडिंगपर्यंत पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात कंपनी अपयशी ठरल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. 
 दुसरीकडे, महाजेनको सातत्याने उणिवांवर जाब विचारत आहे. याबाबत प्राइमसचे व्यवस्थापनही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. कंपनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात, प्रतिसाद देण्यात आणि कराराच्या अटींचे पालन करण्यातही अयशस्वी ठरली.

अशी आहेत कारणे 
 कोळशात  निकृष्ट गोष्टींचे मिश्रण
 नाकारलेला कोळसा चढ्या भावाने विकणे
 वीज केंद्राला निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा
 कोळसा वॉशरीजद्वारे 
पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन

Web Title: Coal Regulatory Agency finally disbanded, iron filings mixed with coal case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.