थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 07:31 PM2016-07-26T19:31:27+5:302016-07-26T19:31:27+5:30

तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़

Coalgate blast at Thalner | थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

थाळनेर येथे कोळशाचा गोरखधंदा

Next

ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. २६ : तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गाव शिवारातील पडीत जमिनीवर असलेल्या काटेरी बाभुळांची सर्ऱ्हास तोडणी करून कोळसा पाडला जात आहे़ विशेषत: थाळनेर ग्रामपंचायतीत गावठान जागेवर कोळसा पाडण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने अनामत रक्कम भरली आहे. मात्र, त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना नाही़ प्रशासनाची डोळेझाक करून बिनधास्तपणे हा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून या परिसरात सऱ्हास सुरू आहे.
दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल
अहमदनगर येथील कोळसा व्यापारी रमेश पवारसह अन्य व्यक्ती तालुक्यातील तापी काठालगत असलेल्या गावातील गावठाण व पडीत जमिनीवरील काटेरी झुडपांची दिवसाढवळ्या कत्तल करतात. आहेत़ होळनांथे, मांजरोद, थाळनेर, टेकवाडे, भटाणे, तऱ्हाडकसबे आदी गावांमध्ये राजरोसपणे कोळसा पाडण्याचा उद्योग सुरू आहे़
पोलीस प्रशासन बसले मूग गिळून
कोळसा व्यापारी रमेश पवार यांनी थाळनेर येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवर कोळसा पाडण्यासाठी रितसर अनामत भरली आहे़
कोळसा पाडल्यावर तो इतरत्र हलविण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते़ ती परवानगी कोणीही घेतलेली नाही़ मात्र त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे वनविभागाने गाडी पकडून कारवाई केली़
एवढा सर्व प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असतांना देखील पोलिस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे़ यामागे देखील मोठे ‘अर्थकारण’ दडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही़
वृत्त प्रसिद्ध करूनही गांभीर्य नाही
यापूर्वी ‘लोकमत’ने १५ मार्च रोजी थाळनेर परिसरातील लहान गावांमध्ये वृक्षतोड करून कोळसा तयार करण्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तरीही पोलीस प्रशासन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अल्प मोबदल्यात राबविले जाते
स्थानिक लोकांना अल्प मोबदला दिला जातो. तसेच ज्या शेतजमिनीवर काटेरी झाडे असतील त्या भागातील जमीन सपाटीकरण करून द्यावी, असा उद्योग कोळसा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे़ विषशेत: झाडे तोडण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मजूर आणले जातात तर कोळसा पाडण्यासाठी अहमदनगर येथील मजूर आणले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
वनविभाग व पोलीस यंत्रणेचा वचक नाही
वनविभागाचे अधिकारी महसूल गावांकडे फिरकत नसल्यामुळे हा गोरख धंदा बिनधास्तपणे सुरू आहे़ कोळसा खाणी लावण्याची परवानगी तहसीलदारांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र, तरीही गाव पातळीवरील स्थानिक पुढारी व अधिकाऱ्यांना खूष ठेवून कोळसा खाणी सुरू आहेत़
इंदौर मार्केटला विकला जातो कोळसा
कमी मोबदल्यात ग्रामस्थांकडून हा कोळसा तयार करून घेतल्यानंतर कोळसा हा इंदौर मार्केटला मोठ्या भावाने विकला जातो. त्यामुळेच हा व्यवसाय तापी काठालगत मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे़

Web Title: Coalgate blast at Thalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.