राज्यातील युती सरकार तर फेकू सरकार
By admin | Published: April 16, 2017 02:00 PM2017-04-16T14:00:55+5:302017-04-16T14:00:55+5:30
शेतक:यांना कजर्माफी देण्याची या सरकारची दानत नसल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारोळा येथे झालेल्या सभेत केली.
Next
अजित पवार : शेतक:यांना कजर्माफी देण्याची राज्यकत्र्याची दानत नाही.
जळगाव, दि.16- राज्यातील युती सरकार हे फेकू सरकार आहे. शेतक:यांना कजर्माफी देण्याची या सरकारची दानत नसल्याची टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष यात्रेदरम्यान रविवारी दुपारी पारोळा येथे झालेल्या सभेत केली.
हे सरकार असंवेदनशील आणि फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतक:यांच्या कजर्माफीसाठी आर्थिक शिस्त बिघडेल असे हे सरकार सांगत आहे. मात्र उद्योगपतींना कजर्माफी करताना आर्थिक शिस्त कशी बिघडली नाही असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर संघर्ष यात्रा बेटावदकडे रवाना झाली.या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर नरडाणा येथे संघर्ष यात्रा दाखल झाली. या ठिकाणी अवघे पाच मिनिटे थांबून संघर्ष यात्रा शिरपूरकडे रवाना झाली होती.
तत्पूर्वी, सकाळी 9 वाजता संघर्ष यात्रा जळगाववरून एरंडोलकडे रवाना झाली.
संघर्ष यात्रेत पाळधी येथून 60 बैलगाडी सहभागी झाल्या. या ठिकाणी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजिव व जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. संघर्ष यात्रेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, काँग्रेसचे भाई जगताप यांनी शेतक:यांसोबत संवाद साधला.