किनारपट्टीच्या पर्यावरणाला सुरुंग
By admin | Published: June 6, 2017 02:48 AM2017-06-06T02:48:09+5:302017-06-06T02:48:09+5:30
पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे डहाणूतील किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासकीय पातळीवरील अनास्थेमुळे डहाणूतील किनाऱ्यालगतच्या पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. रेती चोरीमुळे किनाऱ्याची धूप, तर विसंगत धोरणामुळे वृक्षतोड होत आहे. दरम्यान नागरिकांनी राबवलेल्या ताडगोळे रोपणाच्या अभिनव उपक्र मास वन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे तिलांजली मिळाल्याने पर्यावरण शाबूत राखायचे कसे हा प्रश्न पर्यावरण दिनी नागरिकांना पडला आहे.
पर्यावरणविषयक कार्यक्र मातून पर्यावरण संरक्षण व संवर्धन साधले जाते. या साठी शासन, विविध संस्था आणि नागरिकांकडून कृतीशील सहभाग आवश्यक आहे. डहाणूतील ३५ किमी लांबीच्या किनाऱ्यावरील पर्यावरणाचा समतोल स्थानिक लोकसंस्कृतीशी जोडला गेला आहे. मात्र त्याला स्थानिक प्रशासनाची जोड लाभत नसल्याने पर्यावरण संवर्धंनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे बाराही महिने समुद्रात वाहने उतरवून रेती उपसा केला जातो. परिणामी किनाऱ्याची धूप होत असून प्रतिवर्षी सुरू झाडांची एक रांग जमीनदोस्त होत आहे. शिवाय आठ-दहा वर्षापूर्वी आढळणारे रेतीचे साठे अविरत उपशामुळे नामशेष झाले असून त्यामुळे विणीच्या हंगामात येऊन शेकडो पिल्लांची पैदास थांबून समुद्री कासवांची परंपरा खंडित झाली आहे. केवळ जखमी व मृत कासवे आढळत आहेत.
येथील किनाऱ्यावरील सुरु ंची गर्द हिरवाई आणि गवताची चादर या नैसिर्गक सौंदर्याला वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. या मध्ये काही छुप्यारीतीने अविवेकी स्थानिकांचा हात असून विविध नियमांचा दाखला देत वन विभागाकडून प्रत्यक्ष तोड सुरू आहे.
वयोमार्यादा पूर्ण झाल्याचे कारण देऊन चिखले गावातील सुमारे साडेतीनशे निलिगरी वृक्षांची कत्तल केली जात आहे. जोराचे वारे रोखणारे हे शंभरफूटी वृक्ष जमीन दोस्त होऊ घातल्याने पावसाळ्यात घरं आणि शेतीची अपरिमित हानी होणार असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
>उपक्रम गेला मातीत ७० हजार रोपे तुडवली जात आहेत
नरपड आणि चिखले किनाऱ्यावर मागील सात-आठ वर्षांपासून ताडगोळे रोपणाचा अभिनव उपक्र म स्थानीकांकडून उत्स्फूर्तरीत्या राबविला जात आहे. मात्र डहाणू व बोर्डीवन परिक्षेत्र विभागाच्या आडमुठे धोरणामुळे सुमारे ७० हजार रोपं तुडवली जात आहेत. स्थानिकांनी अनेकदा तक्र ार करूनही वरिष्ठांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे शासकीय अनास्थेचा फटका पर्यावरणाला बसतो आहे. केवळ कागदावर वुक्षारोपणाचे चारअंकी आकडे मांडले जात असून त्याची निपक्षपणे चौकशी झाल्यास प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येईल.
चिखले किनाऱ्यावर सुमारे साडेतीनशे निलिगरी वुक्षांची कत्तल वन विभागाकडून केली जात आहे. एका बाजूला वृक्षारोपणाचा निर्धार आणि दुसरीकडे कत्तल सुरू आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता घडलेला हा प्रकार तत्काळ थांवविण्यात यावा.’’
-किरण पाटील
चिखले ग्रामपंचायत सदस्य