कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा, भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल

By admin | Published: August 18, 2016 09:12 PM2016-08-18T21:12:29+5:302016-08-18T21:12:29+5:30

अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीजीएम) भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल दाखविला आहे़ त्यामुळे

Coastal road survey gets green signal | कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा, भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा, भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीजीएम) भू तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदिल दाखविला आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपाच्या या महत्वाकांक्षी सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे़ पावसाळ्यानंतर लगेचच या कामाला सुरुवात होणार आहे़
नरिमन पॉर्इंट ते कांदिवली असा ३३ कि़मी़ सागरी मार्ग तयार करण्याचा पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे़ पर्यावरण खात्याकडून विविध परवानगीच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प लांबणीवर पडला़ परिणामी या प्रकल्पाचा खर्च आता तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचला आहे़ त्यामुळे पालिकेने भू तांत्रिक सर्वेक्षणासाठी परवानगी मिळण्यापूर्वीच गेल्या महिन्यात सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविला होत्या़
मात्र गेल्याच आठवड्यात एमसीजीएमने आवश्यक सर्व परवानगी दिल्यामुळे आॅक्टोबरपासून कोस्टल रोडच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकेल़ पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे येथील कार्टर रोडपर्यंतच्या कामाला सुरुवात होणार आहे़ भू तांत्रिक सर्वेक्षणाबरोबर या प्रकल्पात रस दाखविणाऱ्या कंपन्यांही बोलाविण्यात येणार आहे़ 

ठेकेदारांची परिषद
कोस्टल रोड हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याने पालिकेने नुकतीच एक परिषद आयोजित केली होती़ यामध्ये ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता़ तसेच त्यांच्याकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करुन त्याची चाचपणी सल्लागारांकडून करुन घेण्यात येणार आहे़़

असे होणार भू तांत्रिक सर्वेक्षण
या सर्वेक्षणांतर्गत सागरी मार्ग तयार करण्यात येणाऱ्या मार्गावरील माती आणि खडकांची चाचणी करुन पुलाचे वजन ते पेलू शकतात का, याची चाचपणी केली जाईल़ या चाचणीतूनच या प्रकल्पाच्या स्थैर्यतेचा अंदाज बांधता येणे शक्य होणार आहे़

* वाहतूक कोंडीमुळे पश्चिम उपनगरातून शहराकडे जाण्यास एक ते दीड तास लागतो़ सागरी मार्गाच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी हा प्रकल्प सुचविण्यात आला आहे़ त्यानुसार नरीमन पॉर्इंट ते कांदिवलीपर्यंत ३३ कि़मी़ चा सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे़

* सागरी मार्गासाठी समुद्रात १६० हेक्टर्स भराव टाकण्यात येणार आहे़ यापूर्वी केवळ बंदर बांधण्यासाठी अशा प्रकारचे भराव टाकण्याची परवानगी देण्यात येत होती़ मात्र रस्त्यासाठी समुद्रात भरणी टाकण्याची परवानगी मिळालेली मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे़

 

Web Title: Coastal road survey gets green signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.