दोन दिवसानंतर आचारसंहिता लागू?
By admin | Published: September 6, 2014 12:21 AM2014-09-06T00:21:37+5:302014-09-06T00:21:37+5:30
विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी 4क् दिवस आधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या तारखेचे वेध इच्छुक घेऊ लागले आहेत.
Next
पुणो : विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी 4क् दिवस आधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या तारखेचे वेध इच्छुक घेऊ लागले आहेत. दोन दिवसांनी आचारसंहिता लागू होईल, अशी चर्चा आज राजकीय वतरुळात होती.
जिल्हा परिषद व महानगरपालिके तर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन गेल्या महिनाभरापासून होत आहेत. बहुसंख्य विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले आहे.
जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ पदाधिका:यांनीही आपापल्या मतदार संघात अशा कार्यक्रमांचा
धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात दोन दिवसांनी आचारसंहिता लागू होईल, असे विधान आज केले.
त्यामुळे गणिते बांधणो सुरू झाले. 8 सप्टेंबरपासून 19 ऑक्टोबर्पयत 4क् दिवस होत असल्याने, 19 ऑक्टोबर नंतर निवडणूक होईल, असा अंदाज त्यावरून आज बांधण्यात येत होता. काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचे निश्चित करून मतदार संघांमधील गावांना भेटी
देत प्रचाराचा पहिला टप्पाही
उरकला आहे.
(प्रतिनिधी)