थंडी पळाली!

By admin | Published: February 2, 2016 04:14 AM2016-02-02T04:14:12+5:302016-02-02T04:14:12+5:30

बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे

Cold! | थंडी पळाली!

थंडी पळाली!

Next

पुणे : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. दिवसा प्रचंड उकाडा जाणवत असून रात्रीच्या तापमानातही सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी वाढ झाल्याने थंडी पळाली आहे. राज्यात येत्या सप्ताहात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरावर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मेघालय व परिसरात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे उत्तर प्रदेशाकडून येणारे थंड वारे अडविले जात आहेत. परिणामी राज्यातील दिवसा व रात्रीच्या तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. किमान तापमानात तब्बल २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे.
जळगाव येथे सर्वात कमी तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर कोल्हापूर येथे तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ होऊन तापमान २० अंशांपर्यंत गेले आहे.

Web Title: Cold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.